शहराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा’ हा महत्त्वाचा घटक आहे. यापुढे प्रत्येक स्मार्ट शहर आणि स्मार्ट घरांच्या उभारणीत सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतील. कोणत्याही यंत्रणेची जेव्हा गरज भासते अथवा ती कार्यान्वित होते तेव्हा त्या व्यवस्थेची देखभाल अथवा दुरुस्ती या बाबी येतातच. त्या करण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. आगामी काळात सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्हीचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढणार हे लक्षात घेऊन सीसीटीव्हीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त केल्यास करिअरच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरू शकते.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत ‘सीसीटीव्ही बिझनेस’ हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अल्प कालावधीचा प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेच्या ‘उद्योजकता विकास प्रकल्प’ अंतर्गत नियमितरीत्या आयोजित केला जातो. या प्रशिक्षणात सीसीटीव्ही यंत्रणेची मूलभूत तत्त्वे, यंत्रणा बसवण्याची कार्यपद्धती, तांत्रिक बाबी, व्यवसायाची शक्यता, प्रकल्प अहवाल आदी विषयांचा समावेश आहे. याशिवाय हा व्यवसाय करण्यासाठी कर्जाची उपलब्धता याविषयीही माहिती दिली जाते.
’खादी व ग्रामोद्योग आयोग ही संस्था केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या प्रशिक्षणाला दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवाराला प्रवेश मिळू शकतो.
पत्ता- सी. बी. कोरा इन्स्टिटय़ूट, शिंपोली गाव, गावदेवी मदानाजवळ, महापालिका शाळेसमोर, िशपोली रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई- ४०००९२.
’मुंबईच्या वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतनात तीन महिने कालावधीचा सीसीटीव्ही फायर अलार्म सिक्युरिटी सिस्टीम हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी अर्हता- दहावी उत्तीर्ण.
पत्ता- ४९, खेरवाडी, अलियावर जंग
मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१.
संकेतस्थळ http://www.gpmumbai.ac.in
ई-मेल- communitypolytechinc
mumbai.@gmail.com

Story img Loader