स्मार्टफोनचा सारा कारभार ज्या कार्यप्रणालीवर अर्थात ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, ती अँड्रॉइड यंत्रणा हा कुतूहलाचा विषय आहे. अॅपलच्या आयओएस आणि मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनपेक्षा बाजारात अँड्रॉइडवर आधारित फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यातच ठरावीक कालावधीनंतर गुगलने अँड्रॉइडच्या नवनवीन आवृत्त्या आणून या यंत्रणेत बदल केले. प्रत्येक नवीन आवृत्ती आधीच्या आवृत्तीपेक्षा अधिक चांगला दृश्यात्मक आणि दर्जात्मक अनुभव देणारी असल्याने नवीन आवृत्त्यांबद्दल मोबाइल ग्राहकांना उत्सुकता असते. अशातच अँड्रॉइडची सहावी आवृत्ती अर्थातच ‘एम’ येत्या काही दिवसांत जाहीर केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अँड्रॉइडची पाचवी आवृत्ती असलेली ‘लॉलिपॉप’ बाजारात अजून नवीनच असताना या पंक्तीत आता ‘एम’ आद्याक्षरावरून सुरू होणारी नवीन आवृत्ती दाखल होत आहे. अधिक चांगले ग्राफिक्स इफेक्ट्स, वेगवान कामगिरी आणि दिसायला आकर्षक असलेल्या लॉलिपॉपचे ती आल्यापासून खूप कौतुक झाले आहे. मात्र, ही कार्यप्रणाली आतापर्यंत बाजारातील दहा टक्के स्मार्टफोनवरच सुरू होऊ शकली आहे. या पाश्र्वभूमीवर अँड्रॉइड ‘एम’चे येणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, अँड्रॉइड ‘एम’ची चर्चा योग्य वेळी होईलच; पण सध्या किटकॅट किंवा त्याआधीच्या अँड्रॉइड सिस्टमवर आधारित स्मार्टफोन वापरणाऱ्यांसमोर स्वस्तातले ‘लॉलिपॉप’ मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने अँड्रॉइडच्या आतापर्यंतच्या सर्वात आधुनिक आवृत्तीवर काम करणाऱ्या १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोन्सवर टाकलेला एक दृष्टिक्षेप..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा