मोबाईलपेक्षा आता टॅब्लेटचा वापर सर्वत्र खूप मोठय़ा प्रमाणावर होताना दिसतो. त्यातही आता टॅब्लेटला कॉलिंगची अर्थात सिम कार्डाची सोय झाल्याने अनेकांच्या बाबतीत स्मार्टफोन ही टॅब्लेट हा प्रश्नच मिटला आहे. सुरुवातीस कमी किमतीचे टॅब्लेट म्हणून अनेकांनी कमी किमतीच्या फारसा मोठा ब्रॅण्ड नसलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांना पसंती दिली. मात्र तरीही आयपॅडची क्रेझ काही कमी झालेली नाही. त्यातच दुसरीकडे आता सॅमसंगने आयपॅडला टक्कर देण्यासाठी नानाविध क्लृप्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिलेल्या इएमआयच्या पर्यायामुळे अनेकजण सॅमसंगकडे वळले. हे लक्षात आल्यानंतर आता अ‍ॅपलनेही आपल्या उत्पादनांना इएमआयचा पर्याय दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा अ‍ॅपलच्या उत्पादनांकडे वळणाऱ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. दर खेपेस लोकांना काही अत्याधुमिक मॉडेलच हवे असते, अशातला भाग नाही. मग लोक कमी किंमतीच्याच मात्र त्याच ब्रॅ्रण्डच्या उत्पादनाकडे वळतात. त्यामुळेच हल्ली पुन्हा एकदा आयपॅड २०१२ आणि आयपॅड २च्या संदर्भात चौकशी करणाऱ्या दूरध्वनींमध्ये वाढ झाली आहे. आपल्याला यातील कोणते उत्पादन घ्यायचे ते समजणे सोपे जावे यासाठी म्हणूनच हा तुलनात्मक तक्ता सोबत देत आहोत.

Story img Loader