स्थानिक लोकांकडूनच भारतातील वेगवेगळय़ा ठिकाणांची, रस्त्यांची माहिती गोळा करणारा ‘कम्युनिटी मॅपिंग प्रोग्रॅम’ नोकियानं गेल्याच आठवडय़ात सुरू केला. काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने  गुगलनंही भारतातील ठिकाणांचं मानचित्रण (मॅिपग) करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. जगातील सर्वात वैविध्यपूर्ण देशांपकी एक असलेल्या भारताचं अधिक जवळून दर्शन घडवणं, हा या उपक्रमांमागील जाहीर हेतू असला तरी या योगाने भारतीय मोबाइल युजर्सशी अधिक ‘कनेक्ट’ होणं आणि अगदी चौका-रस्त्यांवरील दुकानांच्या जाहिरातीतून उत्पन्न मिळवणं, हे व्यावसायिक उद्देशही यामागे आहेतच.
दिवसागणिक बदलणाऱ्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या बाजारातील शर्यतीत टिकून राहण्यासाठी ग्राहकांना रोज काहीतरी नवं देणं ही कंपन्यांची गरज बनली आहे. या गरजेतूनच विविध अ‍ॅप्लिकेशन्स आणि सुविधांचा जन्म होतो. मग ते सोशल नेटवìकग असो की ऑनलाइन चॅटिंग असो, प्रत्येक सुविधेत आणखी सुधारणा करून ग्राहकांसमोर आणण्यासाठी या कंपन्यांचे तंत्रज्ञ दिवसरात्र झटत असतात. अशाच प्रकारची आणखी एक सुविधा म्हणजे ‘मॅिपग’. रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगण्यात समोरच्याला पत्ता विचारण्याचीही फुरसत लोकांकडे नसताना मोबाइलवर असलेली मॅिपग सुविधा ‘वाटाडय़ा’चं काम चोख बजावत आहे. या सुविधेबद्दल वाढतं आकर्षण आणि त्याचा वाढता वापर हे पाहून कंपन्याही या तंत्रज्ञानात नवनवी भर पाडून ते ग्राहकांसमोर आणत आहेत. गेल्याच आठवडय़ात नोकियानं सुरू केलेला ‘कम्युनिटी मॅिपग’ कार्यक्रम आणि गुगलने अलिकडच्या काळात घेतलेली ‘मॅपथॉन’ स्पर्धा याचीच उदाहरणं आहेत.
आपल्याभोवतालंच जग हे दिवसागणिक बदलत असतं. नवे रस्ते होतात, नवीन इमारत उभी राहते, एखाद्या चौकाचं नामकरण होतं, एखादं मोठं सुपरमार्केट किंवा शॉिपग मॉल उभं रहात असतं. असे अनेक भौतिक बदल आपल्या कळत-नकळत घडत असतात. या सगळय़ा बदलांवर आपापसात चर्चा होतच असते. पण ती तेवढय़ापुरतीच मर्यादित राहते. पण आता आपल्या अगदी जवळपास होत असलेल्या या बदलांना थेट भारताच्या नकाशात स्थान देण्याची संधी चालून आली आहे. नोकिया या कंपनीने ‘हीअर’च्या माध्यमातून ‘कम्युनिटी मॅिपग’ कार्यक्रम सुरू केला असून त्याद्वारे आपल्या आसपासचे नवे रस्ते, नवी ठिकाणे, आकर्षणस्थळे यांची थेट ऑनलाइन नकाशांत नोंद करणे शक्य होणार आहे. नोकियाच्या तसेच िवडोज -८ तंत्रज्ञानावर आधारीत मोबाइलवर ही सुविधा वापरता येणार आहे.
हँडसेट उद्योग मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात गेल्यानंतर नोकियाच्या हाती उरलेल्या काही गोष्टींमध्ये ‘मॅिपग’चा समावेश आहे. आता ‘हीअर’च्या माध्यमातून
नोकियाने पहिल्यांदाच भारताएवढय़ा मोठय़ा देशात ‘क्राऊड सोर्सगि’ अर्थात लोकांकडून माहिती गोळा करून नकाशे तयार करण्याचा उपक्रम सुरू केला
आहे. औद्योगिक माहिती आणि युजर्सकडून आलेली माहिती यांचं पृथ्थकरण करून
अद्यायावत आणि अचूक स्थानिक नकाशे तयार करण्याचा कंपनीचा हेतू आहे. यासाठी भारतात एक हजार जणांची नियुक्ती करण्यात आली असून देशभरातील डझनभर विद्यापीठांतील तज्ज्ञ मंडळींचीही यासाठी मदत घेण्यात येत आहे. ‘मॅप क्रिएटर’मार्फत लोकांनी नकाशावर नोंदवलेल्या रस्ते, पूल, रेस्टॉरंट, एटीएम, आकर्षण स्थळे या माहितीची या तज्ज्ञांमार्फत खातरजमा करून घेतली जाणार आहे. तसेच ‘हीअर’ची यंत्रणेनेही ही माहिती तपासून योग्य ठरवल्यास ती मूळ नकाशांवर नोंदवली जाईल व हे सुधारित नकाशे ‘हीअर’वर आधारित जीपीएस यंत्रणा, वाहनांमधील दिशादर्शक, मोबाइल, संकेतस्थळ येथे समाविष्ट करण्यात येतील. काही महिन्यांपूर्वीच, गुगलनेही भारतात अशा प्रकारची योजना सुरू केली होती. नकाशाशोधन करण्यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी तर थेट ‘मॅपथॉन’ नावाची स्पर्धाच घेतली व त्यातून आकर्षक बक्षिसेही जाहीर करण्यात आली. त्यापाठोपाठ आता नोकियाने लोकांकडून स्थानिक माहिती गोळा करण्याच्या उपक्रमात अंग घातले आहे. भारतासारख्या जगातील सर्वात वैविध्यपूर्ण देशाचा अचूक आणि तपशीलवार नकाशा देण्याचा हीअरचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, केवळ हाच हेतू या उपक्रमामागे नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत मॅिपग यंत्रणेचे महत्त्व खूपच वाढले आहे.
धावपळीच्या युगात वेळेचे नियोजन करण्यासाठी प्रत्येकजण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जवळचा पर्याय शोधत असतो. अशावेळी मोबाइलच्या एक क्लिकवर आपल्या नजीकच्या एटीएम, रेस्टॉरंट, सिनेमागृह, बँक, पोस्ट ऑफिस यांची माहिती मिळत असल्याने त्याचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कंपन्याही या यंत्रणेवर अधिक गांभिर्याने
काम करत आहेत.
दुसरं म्हणजे, ‘मॅिपग’साठीची माहिती स्थानिक लोकांकडूनच जमा करण्यात येत असल्यामुळे यात अचूकता येत असल्याने या मॅप्सचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढवण्यातही कंपन्या यशस्वी होत आहेत. तिसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे, अगदी स्थानिक ठिकाणांचे ‘मॅिपग’ करून त्याद्वारे स्थानिक दुकानांच्या जाहिराती मिळवण्याचाही कंपन्यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत यलो पेजेस किंवा ठराविक संकेत स्थळांपर्यंत मर्यादित असलेल्या या जाहिराती या माध्यमातून मोबाइलवर आणण्याचा कंपन्यांचा होरा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Community maps program
Show comments