संगणकामध्ये किंवा मोबाइलमध्ये व्हायरस सोडण्यासाठी हॅकर्स वेगवेळे पर्याय शोधत असतात. यामध्ये आता त्यांनी सुपरहीरोजचा पर्याय शोधला असून त्यांच्या माध्यमातून ते आपल्या संगणकामध्ये शिरकाव करू लागले आहेत.
शक्ती, सामथ्र्य, हीरोगिरी या सर्वाचे आदर्श मानले जाणारे सुपरहीरोज कदाचित तुमच्या संगणक किंवा मोबाइलमध्ये शिरकाव करून त्यातील माहिती चोरी करू शकतात. या सुपर हीरोजच्या नावाने आपण सर्च केले की अनेकदा एखाद्या प्रथितयश किंवा सुरक्षित संकेतस्थळाच्या नावासारखेच नाव असलेले संकेतस्थळ आपल्यासमोर येते. हे संकेतस्थळ आपण सुरू करतो आणि नकळतपणे आपला संगणक हॅकर्सच्या हातात जाऊन पडतो. त्याला एकदा त्याची माहिती मिळाली की त्या माहितीचा तो कसाही गरवापर करू शकतो.
मॅकफी या अँटिव्हायरस कंपनीने नुकतेच याबाबतीत एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अनेक धोके समोर आले. सर्वेक्षण करताना चुकीच्या संकेतस्थळामधून व्हायरसेस, मालवेअर्स कसे शिरकाव करतात याचा अभ्यास करण्यात आला. जून २०१४ मध्ये झालेल्या सच्रेसच्या माध्यमातून हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सुपरहीरोजचे नव्याने येणारे चित्रपट लक्षात घेऊन हॅकर्स मंडळी आणि सायबर गुन्हेगार त्यासंदर्भातील संकेतस्थळांच्या माध्यमातून शिरकाव करण्यास सुरुवात करतात. यासाठी सुपरहीरोजच्या नावांचाच वापर केला जातो. लवकरच येणारा ‘बॅटमॅन व्हस्रेस सुपरमॅन : डॉन ऑफ जस्टिस’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुपरहीरोजच्या सच्रेसमध्ये वाढ झाली आणि यामुळेच व्हायरसेसचा शिरकाव करणाऱ्यांमध्ये सुपरमॅनच्या सच्रेसचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. मॅकफी या कंपनीने टॉप १० सुपरहीरोजच्या सच्रेसची यादी जाहीर केली आहे. ज्यांच्या सच्रेसच्या माध्यमातून व्हायरसेसनी शिरकाव केल्याचे समोर आले आहे.
टॉप १० सुपरहीरोजची यादी
१. सुपरमॅन
२. थोर
३. वंडर वूमन
४. वोल्वेरीन
५. स्पायडरमॅन
६. बॅटमॅन
७. ब्लॅक विडो
८. कॅप्टन अमेरिका
९. ग्रीन लन्रेट
१०. घोस्ट रायडर
या दहा नावांनी झालेल्या सच्रेसमधून स्पायवेअर, अॅडवेअर, स्पॅम, फििशग, व्हायरस आणि इतर मालवेअर्सनी संगणकांमध्ये शिरकाव केल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. सच्रेसमध्ये बहुतांश लोक हे सुपरहीरोजच्या फ्री अॅपचे सेच्रेस करतात. या फ्री अॅपच्या माध्यमातून व्हायरसेस मोबाइलमध्ये शिरकाव करतात. याचबरोबर अनेकदा चित्रपट टोरंटवरून डाऊनलोड केले जातात. त्यामधूनही व्हायरसेस संगणकात शिरकाव करतात.
काय काळजी घ्याल
हे सर्व रोखण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो. याबाबत मॅकफीचे ऑनलाइन सुरक्षा तज्ज्ञ रॉबर्ट सिक्लिनो यांनी काही उपाय सुचविले आहेत.
* तुम्ही सर्च केल्यानंतर जर फ्री कन्टेन्टसाठी अमुक लिंक ओपन करा. असा संदेश आला तर ती लिंक ओपन करण्यापूर्वी विचार करा.
* चित्रपटांच्या अधिकृत संकेतस्थळांवरच भेट द्या. त्याव्यतिरिक्त कोणत्याही संकेतस्थळांवर भेट देताना त्याची सुरक्षा पडताळून पाहा.
* कोणताही व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा डाऊनलोिडग करण्यासाठी प्रस्थापित संकेतस्थळांचाच वापर करा.
* फ्री डाऊनलोिडग असेल तर ते करताना दहा वेळा विचार करा. या माध्यमातूनच अनेकदा मालवेअर्स शिरकाव करत असतात.
* संकेतस्थळाचा पत्ता नीट तपासून घ्या. अनेकदा आपल्याला पत्त्यामध्ये काही गडबड आढळून येत नाही. पण त्याच्या स्पेिलगमध्ये थोडाफार फरक केला जातो. हा फरकच आपल्याला नुकसानदायक ठरू शकतो.
संगणकाला सुपरमॅनचा धोका
संगणकामध्ये किंवा मोबाइलमध्ये व्हायरस सोडण्यासाठी हॅकर्स वेगवेळे पर्याय शोधत असतात. यामध्ये आता त्यांनी सुपरहीरोजचा पर्याय शोधला असून त्यांच्या माध्यमातून ते आपल्या संगणकामध्ये शिरकाव करू लागले आहेत.
First published on: 25-07-2014 at 12:36 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer get threat of superman virus