खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणे हे कोणत्याही नोकरदारास अगदी सोयीचे आहे. मात्र यामध्ये सध्या अनेक व्हारसेसनी गर्दी केली आहे. यामुळे याद्वारे कोणतेही व्यवहार करणे धोक्याचे असते. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे ‘क्रेडिट’ अर्थात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे शॉपिंग करताना किंवा इंटरनेट बँकिंग करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची याबाबत आपण जाणून घेऊ या.
रांगेत उभे राहून वेळ घालवत ‘सुट्टे पसे द्या’, ‘ही नोट चालणार नाही’ अशी काही कटकट सहन करण्यापेक्षा ऑनलाइन पेमेण्टचा पर्याय आजकाल अनेकजण अवलंबतात. शॉिपगप्रमाणे मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगचा ट्रेण्डही एकीकडे झपाटय़ाने पसरत आहे. बँकेतल्या गर्दीला फाटा देत या नव्या पर्यायांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. पण हे करत असताना अनेकदा फसले जाण्याची शक्यताही असते.
गेल्या वर्षी सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले असल्याचे नुकतेच प्रकाशात आले. सायबर गुन्हेगार हे संधीची वाट पाहत असतात. आपण लावलेल्या जाळ्यात कोणती शिकार सापडते याकडेच त्यांचे लक्ष असते. सावधगिरी न राखल्यास सायबर गुन्हेगारांच्या कचाटय़ात सापडण्याची वेळ येऊ शकते. काही लक्षात येण्याच्या आधीच माहितीची चोरी होऊन मोठय़ा रकमेचा फटका बसू शकतो. क्रेडिट कार्डची माहिती चोरून सायबर गुन्हे होण्याची शक्यता अधिक असते.
एखाद्या ठिकाणी शॉिपग करायला गेल्यावर किंवा रेस्तराँमध्ये बिल कार्डवरून देण्याची वेळ आल्यावर कधीच समोर जाऊन पेमेंट केले जात नाही; तसेच सोशल नेटवìकग साइटवरही अनवधानाने स्टेटस अपडेटमध्ये माहिती देण्याचे प्रमाण आहे. हॅकर क्रेडिट कार्डची अतिरिक्त माहितीही मिळविण्याचा प्रयत्न करतात. काही पेमेंट साइटची सुरक्षितताही चांगली असते. मात्र पेमेंट होत नसलेल्या साइटची सुरक्षितता चांगली असेलच असे नाही. काही वेळा संबंधित व्यक्तीकडून स्वतची जन्मतारीख किंवा आईचे नाव किंवा अन्य खासगी माहिती दिली जाते. हॅकर्स अशा माहितीची चोरी करून अन्य व्यक्तींना विकतात. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
प्रत्यक्ष किंवा डिजिटल व्यवहार करताना खबरदारीही घेतली पाहिजे. कार्डचा वापर करीत असताना तुमच्या कार्डवर कोणी नजर ठेवून माहिती कार्डवरील नंबर टिपण्याचा (फोटो) प्रयत्न करीत नाही ना, याची खात्री करायला हवी. कार्ड स्वाइप करताना त्याचे स्कििमग करून माहिती चोरली जाऊ शकते. कार्डावरील मॅग्नेटिक स्ट्रिपवरून माहिती गोळा केली जाते. त्याचे क्लोन केले जाते आणि बनावट कार्ड तयार करण्यात येते. यावर उपाय म्हणून कार्ड कंपन्यांनी चिपवर आधारित कार्ड देण्यावर भर देणे सुरू केले आहे. असे कार्ड स्किम करणे सोपे नाही. अशा कार्डवरून पेमेंट करताना रिसिटवर सही करण्याऐवजी थेट पिन नंबर एंटर करावा लागतो. मात्र , सध्या अशी कार्डे ही परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना किंवा मोठे व्यवहार करण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या ग्राहकांना जारी करण्याचे प्रमाण अधिक आहे. मॅग्नेटिक स्ट्रिपच्या तुलनेत पिन कार्ड अधिक महाग आहे.
ऑनलाइन व्यवहार आपण ज्या संगणकावरून करत आहोत, तो संगणक व्हायर किंवा मालवेअरपासून सुरक्षित आहे का हे पाहा आणि संबंधित पोर्टल हे योग्य आहे का हे तपासा. व्हिसा किंवा मास्टर कार्ड यांच्याकडून संबंधित पोर्टल सुरक्षित केल्याचे सर्टििफकेशन नसल्यास त्याची माहिती घ्या. थेट व्यवहार करण्याचे टाळा.
माहिती चोरीला जाऊ नये यासाठी नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्डचा पासवर्ड वेळोवेळी बदलावा, ब्राउजर योग्य आहे का याची खात्री करा. क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा उपयोग करीत नसल्यास किंवा त्याची वैधता संपली असल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावा.
एटीएम स्लिप कचऱ्याच्या डब्यात टाकण्यापूर्वी ती फाडा आणि मग टाका. बँकेची साइट थेट टाइप करून अ‍ॅक्सेस करा. मेल िलक किंवा अन्य साइटच्या माध्यमातून बँकेची साइट अ‍ॅक्सेस करण्याचे टाळा. मोबाइल फोनवर महत्त्वाची माहिती सेव्ह करू नका.
ऑनलाइन बँकिंग टिप्स
*बँकेच्या साइटवर नेहमीच नवीन िलक ओपन करून जावे.
*ई-मेलमध्ये आलेली िलक ओपन करू नये. आणि तशी कोणती िलक आल्यास बँकेला कळवावे.
*आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड असल्यास आपल्याला ठरावीक रकमेच्या व्यवहारांसाठी तुम्हाला एसएमएस अलर्ट येऊ शकतात.
*कुठलीही बँक कधीही तुमची खासगी माहिती परत मागत नाही. तुम्हाला त्यासंबंधीचा एखादा मेल आला तरी ती माहिती बँकेत जाऊन द्यावी. त्या मेलवरून माहिती देऊ नये.
*बँक स्टेटमेण्ट जर काही वेगळे आढळले तर लगेच बँकेशी संपर्क साधावा.
*ऑनलाइन बँकिंग वापरून झाल्यावर अकाउण्ट नेहमी लॉगआउट करावे.
*बँकेचे व्यवहार करताना सध्या वन टाइम पासवर्ड येतो. हा पर्याय सुरक्षेच्या दृष्टीने अगदी योग्य असतो. म्हणून ऑनलाइन बँकिंग करताना नेहमी आपला फोन जवळ ठेवावा.
प्लास्टिम मनी
पेमेंट करण्याचे चांगले साधन हे प्लास्टिक मनी आहे. मात्र घोटाळे होण्याची शक्यता अधिक असल्याने अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर करीत नाहीत. मात्र तुमच्या कार्डचा वापर करून गरव्यवहार झाला असल्याचे बँकेला किंवा क्रेडिट कार्ड कंपनीला पुरावे दिल्यास पसे परत मिळविता येऊ शकतात. रोख रक्कम चोरीला गेल्यास ती परत मिळविता येत नाही. त्यामुळे कार्डचा पर्याय रद्द करू नये. कार्डच्या माहितीची चोरी होऊ नये, ते सुरक्षित कसे राहू शकते, सुरक्षित ऑनलाइन व्यवहार कसा करायचा हे जाणून घेतल्यास कार्डचा वापर सोपा होऊ शकतो.
प्री-पेड कार्ड
कार्डचा वापर सारखा करावा लागत नसल्यास बँकेकडून प्री-पेड कार्ड घेता येऊ शकते. तुम्हाला हवी तेवढी रक्कम त्यावर जमा करता येऊ शकते. मात्र अशा कार्डचा वापर ऑनलाइन व्यवहारासाठी करणे सोपे नाही. दुसऱ्या टप्प्यातील ऑथेंटिकेशनसाठी ते रजिस्टर होत नाही. त्यामुळे ई-शॉिपगसाठी व्हच्र्युअल क्रेडिट कार्डचा वापर करता येऊ शकतो. यात एकदाच व्यवहार करता येतो.
ऑनलाइन शॉिपग टिप्स
*कोणत्याही साइटवरून शॉिपग करताना खाली ‘लॉक सिम्बॉल’ आहे का याची खात्री करून घ्या आणि पेमेण्ट करताना आपल्या ब्राउजरवर असणाऱ्या अ‍ॅड्रेस बारमध्ये ‘https’ आहे याकडे लक्ष असू द्या, कारण सुरक्षित व्यवहार होत असल्याची ती खूण असते.
*कोणतीही शॉिपग वेबसाइट तुमची जन्मतारीख किंवा तुमची अन्य माहिती मागवत नाही. पण जर तुमची जन्मतारीख आणि क्रेडिट-डेबिट कार्ड नंबर जर कोणाला मिळाला तर ते कॉम्बिनेशन करून कार्ड वापरायचा प्रयत्न करू शकतात.
*शक्यतो नावाजलेल्या वेबसाइट्सवरून शॉिपग करा. जेणेकरून काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधता येतो.
*शक्यतो बाहेरच्या मशीन्सवरून ऑनलाइन ट्रान्झ्ॉक्शन करणे टाळावे.
*वायफाय नेटवर्क सिक्युअर्ड आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असावे.
*आपले क्रेडिट आणि बँक स्टेटमेण्ट चेक करत राहा आणि कोणतेही अन्य चार्जेस लावलेले नाहीत हे पडताळा.
*तुमच्या कॉम्प्युटरवर अपडेटेड अ‍ॅण्टिव्हायरस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स इन्स्टॉल्ड आहेत याकडे लक्ष असू द्या.
*आपला पासवर्ड कोणाला सहज कळेल असा नसावा.
‘पासवर्ड’ची सुरक्षा महत्त्वाची!
माहितीच्या महाजाळात शिरताना ‘पासवर्ड’ या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीशी आपला सामना होतो. ई-मेल, फेसबूक, ट्विटर वा अन्य सोशल नेटवर्किंग साइटमधील आपले वैयक्तिक अकाउंट उघडण्यासाठी पासवर्ड हा महत्त्वाचा टप्पा प्रत्येकाला ओलांडावा लागतो. आता नेटबँकिंग आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षेसाठी ‘पासवर्ड’ अत्यावश्यक असतो. मात्र, सुरक्षेबाबत निष्काळजी आणि अपुरे ज्ञान यांमुळे पासवर्ड विसरणे किंवा तो चोरी होण्याचे प्रकार खूप वाढले आहे. या माध्यमातून ई मेल किंवा बँक अकाउंट ‘हॅक’ होण्याचेही प्रमाण वाढले आहे. हे सर्व आपल्याबाबत घडू नये, यासाठी चांगला पासवर्ड असणे अत्यावश्यक आहे. याच संदर्भातील काही टिप्स
१) पासवर्ड सुरक्षित राहावा आणि लक्षात राहावा असा असावा. १२३४५६  किंवा password  यांसारखे सोपे पासवर्ड ठेवले, तर ते चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे कुणाच्याही लक्षात येणार नाहीत, अशा शब्दांचा किंवा आकडय़ांचा वापर पासवर्डसाठी करावा. मात्र हा पासवर्ड स्वत:च्या लक्षात राहिला पाहिजे, याची काळजी मात्र घेतली गेली पाहिजे.
२) एखादे वाक्य लक्षात ठेवून त्याचा शॉर्टफॉर्म पासवर्डसाठी वापरला, तर ते अधिक सुलभ होईल. असा पासवर्ड हॅक करणेही अवघड आहे. उदा. kThis little piggy went to marketl या वाक्याचा शॉर्टफॉर्म ‘ktlpWENT2ml’ असा करून आपण पासवर्ड बनवू शकतो.
३) तुम्ही तुमच्या आवडत्या एखाद्या गाण्याचाही शॉर्टफॉर्म पासवर्डसाठी वापरू शकता. उदा. ‘‘kkabhi kabhi mere dil mein khayal aata hail या गाण्याचा शॉटफॉर्म तयार करून kkkmDILmkahl असा पासवर्ड तयार करता येईल. मात्र तुमच्या पसंतीचे गाणे सर्वाना माहित असेल तर हे करणे टाळा. कारण अशा गाण्यांचा वापर करून हॅकर्स पासवर्डची चोरी करू शकतात.
४) आकडय़ांमध्ये पासवर्ड देण्यास हरकत नाही. मात्र आकडे क्रमाने देऊ नका. तुमची जन्मतारिख किंवा महत्त्वाच्या दिवसाची तारीख जर तुम्ही पासवर्ड म्हणून दिली, तरी त्याचा तुम्हाला वापर करता येईल. उदा. तुमची जन्मतारीख १४ फेब्रुवारी १९७८ असेल, तर तुमचा पासवर्ड १४०२१९७८ असा तुम्हाला ठेवता येईल.
५) तथ्यहीन किंवा अर्थहीन शब्दांचा वापर केल्यास पासवर्डची चोरी होण्याचा धोका टाळता येतो. उदा. वर्षांतील ३० दिवस असणाऱ्या महिन्यांचा वापर करून SeApJuNo अशा प्रकारचा पासवर्ड तयार करता येईल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आकाश, जयेश, संपदा, विशाल अशी असतील, तर  AkJaySampVish हा तुमचा पासवर्ड.