आपला मोर्चा संकेतस्थळावरून मोबाइलवर वळविण्याचा मानस असलेल्या ई-व्यापार कंपन्यांनी नुकतेच मोबाइलसाठी स्वतंत्र संकेतस्थळं सुरू केली आहेत. यापूर्वी या कंपन्यांचे अॅप्स बाजारात होतेच. अॅप्स आणि मोबाइल संकेतस्थळांमध्ये नेमका काय फरक आहे.
संपूर्ण विश्व आपल्या खिशात आणून देणाऱ्या मोबाइलमुळे तरुणाईचे जीवन खरोखरच स्मार्ट झाले आहे. पण या स्मार्ट जीवनातही आता अनेक गोष्टींचा कंटाळा येऊ लागला आहे. म्हणजे आपल्या मोबाइलमध्ये अॅप्सची गर्दी होते आणि त्यावर येणाऱ्या नोटिफिकेशन्समुळेही आपण कंटाळत असतो. यामुळे अॅप्सपेक्षा संकेतस्थळ बरे असे म्हणायची वेळ आता पुन्हा आली आहे. यामुळेच की काय पण फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसारख्या बडय़ा ई-व्यापार कंपन्यांनी मोबाइल संकेतस्थळ सुरू करण्यास सुरुवात केली आहे. अॅप्स वापरताना किंवा संकेतस्थळ वापरताना काही अडचणी सातत्याने जाणवतात त्यावर एक प्रकाशझोत टाकूया.
.
अॅप्सचा भडिमार
आपल्या फोनची साठवणूक क्षमता आणि आपण वापरत असलेली इंटरनेट सुविधा यावर आपला अॅप्सचा वापर अवलंबून असतो. सध्या बाजारात प्रत्येक छोटय़ा गोष्टीसाठी अॅप उपलब्ध झाले आहेत. आपल्या गरजेनुसार आपण अॅप डाऊनलोड करत असते. यातील अनेक अॅप आपण एकदा वापरून सोडून देतो. पण त्या अॅप्सच्या नोटिफिकेशन्स आपल्यालसमोर गर्दी करत असतात. तसेच फोनमधील साठवणूक क्षमता कमी करत असतात. यामुळे अॅपपेक्षा जर मोबाइल संकेतस्थळ उपलब्ध झाले तर ते आपण आपल्याला पाहिजे त्या वेळेला सुरू करू शकतो.
अॅप की मोबाइल संकेतस्थळ?
अॅप्स आणि मोबाइल संकेतस्थळांमध्ये नेमका काय फरक आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-11-2015 at 09:10 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Difference between application and mobile website