प्रश्न – मला जर एखादा ई-मेल ठरावीक वेळी पाठवायचा असेल किंवा ठरावीक वेळी माझ्या इनबॉक्समध्ये वरती हवा असेल तर जीमेलसाठी तशी काही सुविधा आहे का?
– ओंकार तांबे
उत्तर – गुगलने अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ ई-मेल पाठविण्यासाठी होती. म्हणजे एखादे ई-मेल आपण ड्राफ्टमध्ये सेव्ह केले आणि त्यावर तारीख आणि वेळ दिली की त्या वेळेला बरोबर तो ई-मेल पाठविला जात असे. आता आपल्या इनबॉक्समधील ई-मेलही आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहायचा असेल तर गुगलने त्यासाठी मोबाइलच्या आलार्ममध्ये असते तशी ‘स्नूझ’ची सुविधा दिली आहे. आपल्या ई-मेलवर घडय़ाळय़ासारख्या दिसणाऱ्या चिन्हावर आपण क्लिक केल्यानंतर ‘स्नूझ’चा पर्याय समोर येतो. यामध्ये आपल्याला मेल कोणत्या तारखेला किती वाजता दिसणे अपेक्षित आहे ती वेळ टाकली की त्या वेळेला तो मेल इनबॉक्समध्ये फ्लॅश होतो. हॉटेल बुकिंगपासून ते मीटिंगच्या ई-मेल्सपर्यंतच्या ई-मेल्सना आपण ही सुविधा वापरू शकतो. जेणेकरून आपली वेळ चुकणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा