आपल्याला डिक्टेशन अर्थात शुद्धलेखन या शब्दाचा परिचय शाळेपासूनच होत असतो. एखाद्या व्यक्तीने सांगितलेला किंवा वाचून दाखवलेला मजकूर दुसऱ्या व्यक्तीने लिहून घेणे म्हणजे डिक्टेशन. डिक्टेशनमुळे श्रवण आणि लेखन कौशल्य तपासून बघण्यासाठी मदत होते. श्रवण कौशल्यात प्रत्येक शब्द योग्यपणे कळणे गरजेचे असते. तर लेखन कौशल्यात विरामचिन्हे योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक असते. भाषा इंग्रजी असेल तर योग्य ठिकाणी शब्दांची सुरुवात कॅपिटल अक्षराने करणे, शब्दाचे योग्य स्पेिलग लिहिणे. िहदी अथवा मराठी भाषा असल्यास ऱ्हस्व, दीर्घ, जोडाक्षरे, रफार इत्यादींचा योग्य वापर करणे या सर्वाना महत्त्व असते.
दूरदर्शनवर आपण विविध भाषांतील चित्रपट, गाणी, भाषणे बघत असतो. त्या वेळी बरेचदा चित्रपटातील संवाद, गाण्याचे बोल सबटायटलमध्ये दर्शवले जातात. ही सबटायटल्स मूळ त्याच भाषेतील किंवा भाषांतरित केलेली असतात. तसेच इंटरनेटवरदेखील भाषणे, शैक्षणिक टय़ुटोरियल्स उपलब्ध असतात. काही ठिकाणी त्या भाषणांची ट्रान्सस्क्रिप्ट (लिखित स्वरूपातील भाषण) देखील उपलब्ध असते. एखाद्या कार्यक्रमाचे मूळ भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करताना मूळ स्क्रिप्ट तुमच्याजवळ असणे गरजेचे असते. अशा प्रकारचे ट्रान्सस्क्रिप्शनचे काम करताना तुमच्या श्रवणकौशल्याची कसोटी लागू शकते. अशा वेळी डिक्टेशनच्या सरावाचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.
आज हीच कौशल्ये तपासणाऱ्या काही साइट्स आपण पाहणार आहोत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

https://www.englishclub.com/listening/dictation.htm
या साइटवर शॉर्ट, मीडियम, लाँग डिक्टेशन्स असे तीन भाग उपलब्ध आहेत. शॉर्टमध्ये सात ते आठ शब्द असलेले एक वाक्य, मीडियममध्ये दोन ते तीन वाक्ये तर लाँगमध्ये अंदाजे सहा ते सात वाक्यांचा परिच्छेद आहे. येथे प्रत्येक वाक्य प्रथम सर्वसाधारण गतीने ऐकवले जाते. संथगतीने ऐकण्याची सोयही येथे आहे. तुम्ही ऐकलेले वाक्य लिहिण्यासाठी एक चौकट दिलेली आहे. वाक्य लिहून झाल्यावर स्पेिलग, विरामचिन्ह इत्यादी बरोबर असल्याचे तपासूनही बघता येते. सरावासाठी पन्नासहून अधिक डिक्टेशन्स उपलब्ध आहेत.

http://www.rong-chang.com/eslread/eslread/dict/contents.htm
या साइटवर डिक्टेशनचे २०० भाग उपलब्ध आहेत आणि प्रत्येक भागात अंदाजे दहा वाक्ये डिक्टेट केलेली आहेत. तसेच तुम्हाला उत्तर तपासून पाहता येते. तुम्हाला एखादा शब्द अडला तर तुम्ही ँ्रल्ल३ मागू शकता.

http://www.dictationsonline.com/
या साइटवर एलिमेंटरी ते अ‍ॅडव्हान्स या वेगवेगळ्या लेव्हल्ससाठी कमीत कमी ९ सेकंदांपासून २९ सेकंदांपर्यंतच्या पन्नासपेक्षा अधिक डिक्टेशनच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. वरील दोन साइट्सवर दिलेल्या बहुतांश सुविधा या साइटवरदेखील उपलब्ध आहेत.
– मनाली रानडे, manaliranade84@gmail.com