सोशल नेटवर्किंग म्हणजे फेसबुक असं सध्या समीकरण झालेलं आहे. २००४ साली अमेरिकेतील एका कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी सुरू झालेल्या या संकेतस्थळाचं जाळं आता जगभर पसरलेलं आहे. विशेषत: गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सोशल नेटवर्किंगचं फॅड मोठय़ा प्रमाणात जोर धरू लागलं आणि त्यामध्ये अग्रस्थानी होते फेसबुक. फक्त तरुणांनाच नव्हे तर आता प्रौढ आणि वयस्कर व्यक्तींनाही फेसबुक म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यावर अॅक्टिव्ह व्हायचं असतं. म्हणूनच की काय गेल्याच आठवडय़ात फेसबुकने एक कोटी युजर्सचा आकडा पार केला. फेसबुकही आपल्यावर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून ते कसं युजर फ्रेंडली करता येईल याच्या प्रयत्नात आहे. विशेषत: काही महिन्यांपूर्वी आलेल्या फेसबुक टाइमलाइननंतर अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी त्याच अनेकांना खूपच किचकट वाटू लागल्या आहेत. म्हणूनच ‘टेकइट’च्या वाचकांसाठी नव्याने दाखल झालेल्या वैशिष्टय़ांची आम्ही थोडक्यात ओळख करून देत आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा