हिग्ज बोसॉन- वर्षांतील
सर्वात मोठी वैज्ञानिक कामगिरी
सायन्स या नियतकालिकाने २०१२ या वर्षांतील सर्वात महत्त्वाच्या शोधाचा मान हिग्ज-बोसॉन या कणासारखेच गुणधर्म असलेल्या कणाच्या शोधाला दिला आहे.
हिग्ज बोसॉनची संकल्पना ४० वर्षांपूर्वी ब्रिटिश सैद्धांतिक वैज्ञानिक पीटर हिग्ज यांनी मांडली, या कणाला गॉड पार्टिकल असेही म्हटले जाते. जे सूक्ष्म कण इलेक्ट्रॉन व क्वार्कचे बनलेले नसतात त्यांना वस्तुमान कशामुळे प्राप्त होते याचे स्पष्टीकरण हिग्ज बोसॉनच्या मदतीने करण्यात आले.
असे असले तरी मूळ हिगज  बोसॉन हाती लागल्याबाबत साशंकता आहे. वैज्ञानिकांनी नंतर दोन नवीनच बोसॉन कण या प्रयोगात सापडले असल्याचा दावा केला आहे.

स्काय क्रेन
 नासाच्या स्काय क्रेनने अतिशय सफाइदारपणे क्युरिऑसिटी ही गाडी मंगळावर उतरवली. ५६ कोटी ३० लाख किलोमीटरचा प्रवास करून क्युरिऑसिटी गाडी अलगदपणे तेथे उतरली हे यंत्रमानवशास्त्रातील एक आश्चर्य मानले जाते.

क्ष-किरण लेसर
नोव्हेंबर महिन्यात क्ष-किरण लेसरच्या मदतीने प्रथमच प्रथिनाची रचना उलगडण्यात आली. आफ्रिकेतील स्लीपिंग सिकनेसला कारणीभूत ठरणाऱ्या ट्रायपनोसोमा ब्रुसेई या एकपेशीय परजीवी घटकाच्या जगण्यास मदत करणारे वितंचक म्हणून जो घटक काम करतो त्याचे हे प्रथिन म्हणजे पूर्वरूप असल्याचे मानले जाते.

 

न्यूट्रिनो
विश्वात वस्तुमान अधिक व प्रतिवस्तुमान कमी आहे याचे स्पष्टीकरण करणाऱ्या प्रयोगात न्यूट्रिनो हे कण एकमेकातून कसे बनत जातात हे सांगणाऱ्या शेवटच्या घटकांचे मापन करण्यात भौतिकशास्त्रज्ञांना यश आले आहे.

 

डेनीसोव्हॅन डीएनए
सायबेरियातील डेनीसोवा गुहेत पन्नास हजार वर्षांपूर्वी जो मानव राहात होता त्याच्या ९९.९ टक्के जनुकांच्या संकेतावलीचा क्रम हा उलगडण्यात आला आहे. हाताच्या बोटाचे हाड व दोन दाढा यांच्या मदतीने ते तयार करण्यात आले आहे.

 

एनकोड प्रोजेक्ट
सुमारे दशकभर चालणाऱ्या २८८ दशलक्ष डॉलरच्या या प्रकल्पात एरवी निकामी ठरवले गेलेले जंक जीन्स प्रत्यक्षात कशी महत्त्वाची भूमिका पार पाडतात हे शोधले जात आहे. यात हे जंक जीन्स हे निरोगी जीन्सना ऑन-ऑफ करीत असतात. त्यांचा एनसायक्लोपीडिया (ज्ञानकोष) तयार करण्याचा हा प्रकल्प आहे.

मजोरना फर्मिऑन्स
 या कणांचा शोध लागल्याने स्थिर क्वांटम कॉम्प्युटर तयार करण्यात मदत होणार आहे. मजोरना फर्मिऑन्स हे स्वत:च स्वत:चे प्रतिवस्तुमान म्हणून काम करतात तसेच नष्टही होतात.

मूलपेशीपासून अंडपेशी
 प्रयोगशाळेत उंदराच्या गर्भातील मूलपेशीपासून मिळवलेल्या अंडपेशीपासून छोटय़ा उंदराच्या पिलांना जन्म देण्यात यश आले आहे.

मेदू-यंत्र संपर्क यंत्रणा
 पक्षाघात झालेल्या रुग्णातील मेंदूत इलेक्ट्रोड लावून त्याच्या मदतीने त्याच्या विचारांचे संदेश रूपांतरित करून यांत्रिक हाताने त्या सूचनेनुसार हालचाली केल्या.

Story img Loader