भारतातील स्मार्टफोनच्या बाजारावर जगातील अनेक कंपन्यांचे लक्ष केंद्रित झालेले पाहायला मिळते. गुगलने आपल्या अॅण्ड्रॉईड वन या बहुप्रतिक्षित स्मार्टफोनचे सर्वप्रथम भारतात सोमवारी अनावरण केले. यासाठी गुगलने मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाईस या तीन भारतीय कंपन्यांशी हातमिळवणी केली असून, लवकरच एसर, अलकॅटल वन टच, झोलो, एचटीसी, लाव्हा, इंटेक्स, एसस आणि लिनोव्हो या कंपन्यांशीही भागीदारी करणार आहे. मीडियाटेकचा प्रोसेसर असलेल्या या फोनची किंमत ६,३९९ पासून सुरू होते. सर्वसामान्यांना परवडेल अशा मध्यमप्रतीच्या या फोनमध्ये ४.५ इंचाचे टच स्क्रिन, १.३ गेगाहर्टस् मीडियाटेक प्रोसेसर, आणि ४ जीबीची अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. युट्यूबवरील व्हिडिओ पाहाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे डाटा चार्जेस द्यावे लागणार नाहीत, हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे. आजपासून हा फोन फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन या ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर उपलब्ध होत आहे. दिवाळीच्या आसपास हा फोन दुकानांमधून मिळण्यास सुरुवात होईल. अॅण्ड्रॉईडचे लेटेस्ट अपडेट्स सर्वात प्रथम या फोनवर उपलब्ध होतील. याशिवाय गुगलची भारतासाठीची भाषांतराची सुविधादेखील यात देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा