गुगलने नेक्सस ७ या टॅब्लेटची विक्री भारतीय बाजारपेठेत गुगल प्ले स्टोअरमार्फत सुरू केली आहे. १६ जी. बी. वायफाय आवृत्ती ही या स्टोअरमध्ये विक्रीस असून त्याची किंमत ही १५, ९९९ रुपये आहे. नोंदणी केलेल्यांना हा टॅब्लेट पाच एप्रिलपर्यंत मिळणार आहे. गुगलचे कार्यकारी अध्यक्ष एरिक श्मिड्ट यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान भारतीय बाजारपेठेत नेक्सस टॅब्लेट उपलब्ध करून देण्यात येत आहे. यापूर्वीही कंपनीने २०१२ मध्ये अॅसस टॅब्लेट भारतात प्रदर्शित केला होता. नेक्सस ७ टॅब्लेट जून २०१२ मध्ये प्रदर्शित करण्यात आला व नंतर जुलैमध्ये त्याची विक्री सुरू झाली होती.
गुगल नेक्सस हा टॅब्लेट अँड्रॉइड जेली बीन सिस्टिमवर चालतो. त्याला एनविडिया टेग्रा ३ क्वाड कोअर प्रोसेसरच जोड आहे. त्याचा मॉनिटर ७ इंचाचा असून त्याची विवर्तन क्षमता १२०० x ८०० पिक्सेल आहे. अमेरिकेपेक्षा भारतात त्याची किंमत आयात शुल्क व इतर कारणास्तव जास्त आहे. गुगल त्यांचा नेक्सस ४ व नेक्सस १० हे दहा इंची टॅब्लेट भारतीय बाजारपेठेत सादर करणार का? हा खरा प्रश्न आहे.
गुगल नेक्सस ७ टॅब्लेट – १६ जी. बी. वायफाय आवृत्तीची किंमत १५, ९९९ रुपये आहे. नोंदणी केलेल्यांना हा टॅब्लेट पाच एप्रिलपर्यंत मिळणार आहे.