सोशल साईटसवर एखाद्या अकाऊंटवर स्वत:ची ओळख पटवून देताना अस्ताव्यस्त आणि विचित्र आकारातील इंग्रजी शब्द ओळखण्याचे कंटाळवाणे सोपस्कार तुम्ही अनेकदा पार पाडले असतील. तुमचे अकाऊंट एखाद्या यंत्रमानवाकडून तर वापरले जात नाही ना, याची खात्री करून देण्यासाठी ‘कॅप्चा कोड’चा वापर करण्यात येतो. मात्र, गुगलने आता ‘कॅप्चा कोड’ला अलविदा करण्याचा निर्णय घेतला असून, त्या जागी टिक बॉक्सेसचा पर्याय असणारी ‘रिकॅप्चा’ ही नवीन पद्धत आणण्याचे ठरवले आहे. सोशल साईटसवर एखादे नवीन अकाऊंट ओपन करताना अथवा रजिस्ट्रेशन करताना ‘कॅप्चा कोड’चे दिव्य पार केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नसे. व्हर्च्युअल दुनियेतील स्पॅम आणि मालवेअर यासारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी कॅप्चाचा वापर अनिवार्य होता. अलिकडे स्नॅपचॅट, वर्ल्डप्रेस, हम्बल बंडल यांसारख्या वेबसाईटसवर कॅप्चाचेच नवीन स्वरूप असणाऱ्या ‘रिकॅप्चा’चाही वापर सुरू झाला होता. यामध्ये इंग्रजी अक्षरांऐवजी तुम्हाला स्क्रिनवर दिलेल्या संकेतांच्याआधारे दिलेल्या छायाचित्रांपैकी योग्य छायाचित्र निवडण्यास सांगितले जाते. अगोदरच्या कॅप्चाच्या तुलनेत हा प्रकार स्मार्टफोनवर वापरण्यास अत्यंत सोपा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा