वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी रशियाने अवकाशात सोडलेल्या उपग्रहाचा लष्करी हेरगिरी करण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, अशी सुपीक कल्पना अमेकिन लष्कराच्या डोक्यात आली. त्यावर संशोधन होऊन सॅटेलाइट नेव्हिगेशन या तंत्रज्ञानाचा उगम झाला. अमेरिकन लष्करी        उपयोगाकरिता पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत उपग्रह सोडून, त्यांनी प्रक्षेपित केलेले संदेश ग्रहण करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक स्थान ठरविण्यासाठी आणि शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. हेच सॅटेलाइट नेव्हिगेशन ठरावीक क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता अखंड पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक क्षेत्राकरिता वापरले गेले तर त्याचे ग्लोबल नेव्हिगेशन  सॅटेलाइट सिस्टिम नामकरण करण्यात आले आणि हेच आत्ताच्या प्रचलित जीपीएस तंत्रज्ञानाचा पाया आहे.
आपल्या हातातील स्मार्टफोन आणि घडय़ाळंमध्येही आता जीपीएस तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हल्ली हे तंत्रज्ञान आता सोशल मीडियासोबत कनेक्ट करून त्याचा अधिक प्रभावी वापर करण्यात येत आहे. बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या गाडय़ांमध्ये जीपीएस तंत्रज्ञान बसवलेले पाहावयास मिळते. फिरायला जाताना आणि विशेषत: अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टीव्हिटीजसाठी म्हणजेच ट्रेकिंग, मोटारबाइक आणि सायकलिंगसाठी मोठय़ा प्रमाणात जीपीएसचा वापर अनिवार्य झाला आहे.   

कारसाठीचे जीपीएस मॉडेल्स
tech07गारमिन नुवी ३५९७ एलएमटीएचडी
किंमत – अंदाजे २० हजार रुपये
डिस्प्ले आकार – पाच इंच
डिस्प्ले प्रकार – कॅपॅसिटीव्ह टच
स्क्रिन रेसोल्यूशन – ८०० बाय ४०० पिक्सेल
वजन – १९३ ग्रॅम
ब्लुटूथ सुविधा – होय
थ्रीडी लेन मार्गदर्शक – होय
मोफत आजीवन नकाशे – होय
मोफत आजीवन ट्रॅफिक – होय
हे चांगले – मॅग्नेटिक माऊंट, ग्लास कॅपेसिटीव्ह डिस्प्ले सपोर्ट मल्टी टच, व्हॉइस प्रॉम्प्टची सुधारित आवृत्ती.
हे वाईट – महाग, प्रकाशामध्ये स्क्रिन सूर्यप्रकाश परावर्तीत करते, ट्रॅफिक आणि ठिकाणाची माहिती नेहमीच अचूक मिळत नाही.

मेगॅलन स्मार्ट जीपीएस
tech08किंमत – अंदाजे १६ हजार रुपये
डिस्प्ले आकार – पाच इंच
डिस्प्ले प्रकार – कॅपॅसिटीव्ह टच
स्क्रिन रेसोल्यूशन – ८०० बाय ४०० पिक्सेल
वजन – २१३ ग्रॅम
ब्लूटूथ सुविधा – होय
थ्रीडी लेन मार्गदर्शक – होय
मोफत आजीवन नकाशे – होय
मोफत आजीवन ट्रॅफिक – होय
हे चांगले – डब्लूवीडीए टच स्क्रिन असलेले स्वस्त मॉडेल, स्मार्टफोन आणि वायफायचा वापर करून लाइव्ह पीओआय (पॉइंट ऑफ इंटरेस्ट) अपडेट्स मिळवता येतात, क्लाऊड बेस बॅकअप.
हे वाईट – अत्यंत गुंतागुंतीचे, इंटरफेस अतिशय किचकट, बिल्ट इन क्लाऊड आणि फोन कनेक्टिव्हिटी योग्य तो परिणाम देत नाही.

गारमिन नुवी २५९७ एलएमटी
tech09किंमत – अंदाजे १४ हजार रुपये
डिस्प्ले आकार – पाच इंच
डिस्प्ले प्रकार – रेसिस्टिव्ह टच
स्क्रिन रेसोल्यूशन – ४८० बाय २७२ पिक्सेल
वजन – १९७ ग्रॅम
ब्लूटूथ सुविधा – होय
थ्रीडी लेन मार्गदर्शक – होय
मोफत आजीवन नकाशे – होय
मोफत आजीवन ट्रॅफिक – नाही
हे चांगले – मॅग्नेटिक माऊंट, व्हॉइस प्रॉम्प्टची सुधारित आवृत्ती.
हे वाईट – सुविधांच्या मानाने महाग, प्रकाशामध्ये स्क्रिन सूर्यप्रकाश परावर्तीत
करते, ट्रॅफिक आणि ठिकाणाची माहिती अचूक मिळत नाही.

टॉम टॉम वीआयए १६०५ टीएम  
tech12किंमत – अंदाजे १२ हजार रुपये
डिस्प्ले आकार – पाच इंच
डिस्प्ले प्रकार – रेसिस्टिव्ह टच
स्क्रिन रेसोल्यूशन – ४८० बाय २७२ पिक्सेल
वजन – २६९ ग्रॅम
ब्लूटूथ सुविधा – नाही
थ्रीडी लेन मार्गदर्शक – होय
मोफत आजीवन नकाशे – नाही
मोफत आजीवन ट्रॅफिक – नाही
हे चांगले – आकाराला मोठा आणि ठळक डिस्प्ले, अचूक मार्ग, थ्रीडी लेन मार्गदर्शक खूप चांगले, जाहीराती नाहीत.
हे वाईट – ब्लूटूथ सुविधा आणि हॅन्ड्स-फ्रीची सुविधा नाही, एचडी ट्रॅफिक प्लग इन सपोर्ट नाही.

सायकलिंगसाठी जीपीएस मॉडेल्स
tech10गारमिन एज ५१०
वेग – मोजता येतो
वेळ – मोजता येते
अंतर – मोजता येते
उंची – मोजता येते
तापमान – मोजता येते
हार्टरेट सेंसर अलार्म – होय
पेडल पॉवर सेंसर – होय
पेडल केडन्स सेंसर – होय
टचस्क्रि न इंटरफेस – नाही
वॉटर रेसिस्टन्स – होय
रंगीत स्क्रि न – होय
वजन – ५६ ग्रॅम
बॅटरी लाइफ – २० तास (रिचार्जेबल लिथियम बॅटरी)
स्क्रि नचा आकार – १.८ इंच
मॅप सपोर्ट – नाही
सपोर्ट – फोन, ईमेल, मार्गदर्शक व्हीडिओ
किंमत – अंदाजे २० हजार रुपये
हे चांगले – खूप चांगली कार्यक्षमता, चांगला टच स्क्रिन, चांगली बॅटरी लाइफ, वापरण्यासाठी सोपे.
हे वाईट – अनोळखी प्रदेशातील नकाशांसाठी उपयुक्त नाही.

मेगॅलन सायक्लो ५०५
tech13वेग – मोजता येतो
वेळ – मोजता येते
अंतर – मोजता येते
उंची – मोजता येते
तापमान – मोजता येते
हार्टरेट सेंसर अलार्म – होय
पेडल पॉवर सेंसर – होय
पेडल केडन्स सेंसर – होय
रंगीत स्क्रि न – होय
टचस्क्रि न इंटरफेस – होय
वॉटर रेसिस्टन्स – होय
वजन – १२७ ग्रॅम
बॅटरी लाइफ – १२ तास
स्क्रि नचा आकार – ३ इंच
मॅप सपोर्ट – होय
सपोर्ट – फोन, ईमेल, मार्गदर्शक व्हीडिओ
किंमत – अंदाजे २३ हजार रुपये
हे चांगले – अतिशय चांगल्या प्रतीची सेंसर अनुरूपता, स्मार्टफोनसोबत खूप चांगल्या पद्धतीने पेअर करता येतो आणि ओपोआप रस्ता शोधतो.  
हे वाईट – बॅटरी श्रमता खूपच कमी, टचस्क्रिन इतका खास नाही, महाग.

सिग्मा स्फोर्ट्स रॉक्स १०.०
tech11वेग – मोजता येतो
वेळ – मोजता येते
अंतर – मोजता येते
उंची – मोजता येते
तापमान – मोजता येते
हार्टरेट सेंसर अलार्म – होय
पेडल पॉवर सेंसर – होय
पेडल केडन्स सेंसर – होय
रंगीत स्क्रि न – नाही  
टचस्क्रि न इंटरफेस – नाही
वॉटर रेसिस्टन्स – होय
वजन – ६२ ग्रॅम
बॅटरी लाइफ – १३ तास
स्क्रि नचा आकार – १.८ इंच
मॅप सपोर्ट – नाही
सपोर्ट – फोन, ईमेल, मार्गदर्शक व्हिडिओ
किंमत – १३ हजार रुपये
हे चांगले – हार्टरेट सोबत खूप चांगल्या पद्धतीने जोडले जाते.
हे वाईट – अंतर मोजण्यामध्ये चुका.

न्यू हॉलक्स जीपीएस स्पोर्ट्स २४५
tech14वेग – मोजता येतो
वेळ – मोजता येते
अंतर – मोजता येते
उंची – मोजता येते
तापमान – नाही
हार्टरेट सेंसर अलार्म – जोडता येतो
पेडल पॉवर सेंसर – नाही
पेडल केडन्स सेंसर – नाही
रंगीत स्क्रि न – एलसीडी  
टचस्क्रि न इंटरफेस – नाही
वॉटर रेसिस्टन्स – होय
वजन –  ग्रॅम  
बॅटरी लाइफ – २०-२२ तास (रिचार्जेबल  बॅटरी)
स्क्रि नचा आकार – २.५ इंच
मॅप सपोर्ट – नाही
माहिती स्टोरेज – २ जीबी
सपोर्ट – नाही
किंमत – अंदाजे सहा हजार रुपये  
हे चांगले – कमी किंमत, आवश्यक तेवढय़ा वापरासाठी उपयुक्त.  
हे वाईट – खूपच बेसिक डिव्हाईस.

Story img Loader