वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी रशियाने अवकाशात सोडलेल्या उपग्रहाचा लष्करी हेरगिरी करण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो, अशी सुपीक कल्पना अमेकिन लष्कराच्या डोक्यात आली. त्यावर संशोधन होऊन सॅटेलाइट नेव्हिगेशन या तंत्रज्ञानाचा उगम झाला. अमेरिकन लष्करी उपयोगाकरिता पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत उपग्रह सोडून, त्यांनी प्रक्षेपित केलेले संदेश ग्रहण करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भौगोलिक स्थान ठरविण्यासाठी आणि शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. हेच सॅटेलाइट नेव्हिगेशन ठरावीक क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता अखंड पृथ्वीवरील कोणत्याही भौगोलिक क्षेत्राकरिता वापरले गेले तर त्याचे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम नामकरण करण्यात आले आणि हेच आत्ताच्या प्रचलित जीपीएस तंत्रज्ञानाचा पाया आहे.
आपल्या हातातील स्मार्टफोन आणि घडय़ाळंमध्येही आता जीपीएस तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हल्ली हे तंत्रज्ञान आता सोशल मीडियासोबत कनेक्ट करून त्याचा अधिक प्रभावी वापर करण्यात येत आहे. बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या गाडय़ांमध्ये जीपीएस तंत्रज्ञान बसवलेले पाहावयास मिळते. फिरायला जाताना आणि विशेषत: अॅडव्हेंचर अॅक्टीव्हिटीजसाठी म्हणजेच ट्रेकिंग, मोटारबाइक आणि सायकलिंगसाठी मोठय़ा प्रमाणात जीपीएसचा वापर अनिवार्य झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा