प्रश्न – हॉटस्पॉट म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा.
– यश मुळीक
उत्तर – हॉटस्पॉट म्हणजे एखाद्या उपकरणाच्या माध्यमातून विशिष्ट परिसरात वाय-फायच्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध होते. यामुळे मोबाइलच्या माध्यमातून दुसऱ्या मोबाइलवर किंवा संगणकासारख्या उपकरणावर इंटरनेट वापरता येऊ शकते. हॉटस्पॉट वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमध्ये ती सुविधा आहे का ते पाहावे लागेल. ती सुविधा नसेल तर वाय-फाय हॉटस्पॉटचे अ‍ॅप्स मोबाइलच्या अ‍ॅपच्या बाजारात उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमतून तुम्ही वाय-फाय हॉटस्पॉट तयार करू शकता. यासाठी तुम्ही अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुमच्या मोबाइलमध्ये सेटिंग्ज तयार होऊन तुमच्या मोबाइल डेटा जोडणीतील इंटरनेट तुम्ही वाय-फायच्या माध्यमातून शेअर करू शकता. हा हॉटस्पॉट तयार करताना सर्वप्रथम तुम्ही तुमचे वाय-फाय सुरक्षित करणे आवश्यक असते. म्हणजे त्याला पासवर्ड देणे गरजेचे आहे. म्हणजे ज्यांना कुणाला तुम्हाला ही जोडणी द्यावयाची आहे त्यांनी पासवर्ड टाकल्याशिवाय तुमच्या फोनमधील जोडणी घेऊ शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रश्न – माझ्या घरच्या संगणकावर विंडोज एक्स्पी आहे. त्यावर गेला एक आठवडा गुगल क्रोम हळू चालते. युटय़ूबवरील व्हिडीओ पूर्ण बफर होतो म्हणजे इंटरनेटचा वेग चांगला आहे. पण क्रोम स्क्रोल डाऊन किंवा स्क्रोल अप करत असताना क्रोम काम करायचेच थांबते. – सर्वेश देसाईे
उत्तर – क्रोम हळू चालत असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमचे अँटिव्हायरस आणि फायरवॉल सेटिंग्ज तपासून बघा. अनेकदा आपल्या फायरवॉल सेटिंग्जमुळे वेब ब्राऊजर हळू हळू काम करते. यामुळे तुम्ही ज्यावेळेस संगणकात इंटरनेट वापरत असाल तेव्हा फायरवॉल सेटिंग्ज जरूर पाहा. जर तुम्हाला अमुक एक संकेतस्थळ पाहात असातनाच ही अडचण येत असेल तर तुम्ही क्रोमच्या सेटिंग्जच्या पर्यायात जा. तेथे ‘शो अ‍ॅडव्हान्स सेटिंग्ज’ हा पर्याय निवडा. त्यातील प्रायव्हसी विभागात ‘पड्रिक्ट नेटवर्क अ‍ॅक्शन टू इंप्रूव्ह पेजेस लोड परफॉर्मन्स’ हा पर्याय डीसिलेक्ट करा. यानंतर क्रोम व्यवस्थित चालणे अपेक्षित आहे. तरीही अडचण येत असेल तर तुम्ही क्रोम अनइंस्टॉल करून पुन्हा इंस्टॉल करा.
– तंत्रस्वामी

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotspot of phone
Show comments