प्रश्न –  माझ्याकडे मायक्रोमॅक्स कॅन्व्हास मोबाइल आहे. त्यामध्ये मराठी फॉण्ट कसा इन्स्टॉल करायचा.     
– जितेंद्र पवार
उत्तर – मराठी फॉण्ट इन्स्टॉल करण्यासाठी अँड्रॉइडवर गो की-बोर्डचे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला मराठी की-बोर्ड वापरता येऊ शकतो. तुम्ही जेव्हा संदेश टाइप करायला लागता त्या वेळेस तुम्हाला की-बोर्डचा मराठी किंवा इंग्रजी की-बोर्डचा पर्याय विचारला जातो. त्यात तुम्ही मराठीचा पर्याय निवडला की तुमचा की-बोर्ड मराठी होतो. यामध्ये तुम्हाला मराठी आद्याक्षरे दिसतात. याशिवाय तुम्हाला पिनाकिन किंवा मराठी प्राइड हे की-बोर्डही उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला इंग्रजीतून मराठी असे टाइप करता येऊ शकते.
प्रश्न-  मला सॅमसंगचा मोबाइल घ्यायचा आहे. मी नेहमी ऑनलाइन शॉिपग करतो. माझ्याकडे मोबाइल आल्यावर तो ओरिजिनल आहे का, हे कसे तपासू?     
 संजय महाजन
उत्तर – मोबाइल ओरिजिनल कंपनीचा आहे का? हे तपासण्यासाठी तुम्ही आयएमईआय नंबर व्हेरिफाय करणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाइलवर *#06# टाइप केलं की, तुम्हाला १५ आकडी आयएमईआय नंबर मिळेल किंवा सध्याच्या स्मार्टफोनमध्ये अबाउट डिव्हाइसमध्ये तुम्हाला हा नंबर मिळू शकतो. हा नंबर मेसेजमध्ये टाइप करून तो ५३२३२ किंवा ५७८८६ वर एसएमएस करा. यानंतर तुम्हाला आयएमईआय नंबर चेक फोन इज जेन्युइन सॅमसंग फोन, असा मेसेज येईल. जर तो मोबाइल ओरिजिनल नसेल, चोरलेला असेल, सेकंड हॅण्ड असेल तर त्या संदर्भातील माहिती मिळेल. बिल घेताना पक्के बिल घ्या. त्यावर दुकानदाराचा व्हॅट नोंदणी क्रमांक असल्याची खात्री करा. रकमेवर व्हॅट लावलाय का ते तपासा आणि बिलावर बॉक्सवरील मॉडेल नंबर, आयएमईआय नंबर लिहून घ्या.