प्रश्न –  मी गुगल प्लेवरून अ‍ॅप खरेदी करताना डेबिट कार्डच्या माध्यमातून पसे देताना एरर येतो. ही खरेदी मी कशी करू शकतो.            
-सचिन वानखेडे
उत्तर –  तुम्ही गुगल वॉलेटमधून पसे भरत असताना तुम्हाला एरर येत असेल तर तुमची बँकेतील आणि गुगल वॉलेटमध्ये दिली असलेली माहिती खातरजमा करून घ्या. तुम्ही गुगल वॉलेटमध्ये नोंदणी केल्यानंतर बँकखात्यातील नावात, पत्त्यात किंवा इतर कोणत्याही माहितीत बदल केला असेल तर तो बदल गुगल वॉलेटमध्येही करून घ्या. जर तुमची दोन्हीकडची माहिती अचूक असेल आणि तरीही एरर येत असेल तर कार्ड क्रमांक देताना, एक्स्पायरी तारीख देताना स्पेसचा वापर केला नाही ना याची काळजी घ्या. इंटरनेट जोडणी बरोबर आहे ना हेही पाहा. ही काळजी घेतल्यावर पेमेंट होण्यास काहीच हरकत नाही. तरीही अडचण येत असेल तर गुगल वॉलेट किंवा तुम्ही जो पेमेंट गेट वे वापरता तो अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा.
प्रश्न – मला माझ्या फोनमधून वित्तीय कामे करायची असतात. मला सुरक्षित फोन हवा आहे. अँड्रॉइडवर माझा भरवसा नाही. मी अ‍ॅपल किंवा ब्लॅकबेरी यांपकी कोणता फोन घेऊ. -महेश
उत्तर – तुम्हाला एकदम सुरक्षित फोन हवा असेल तर तुम्ही अ‍ॅपल आणि ब्लॅकबेरी या दोन्हीचा पर्याय स्वीकारू शकता. तुम्हाला लेटेस्ट तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा हव्या असतील तर तुम्हाला अ‍ॅपलचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. अ‍ॅपलचा फोन सुरक्षित असून तो फोन घेण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक असलेले अ‍ॅप्स त्यामध्ये उपलब्ध आहेत की नाही हेही तपासून घ्या. अन्यथा फोन घेतल्यावर अपेक्षित काम पूर्ण करणे तुम्हाला जमणार नाही.

Story img Loader