भारतातील प्रत्येक नागरिकाच्या खिशात स्मार्टफोन दिसेल ते दिवस आता दूर नाहीत. कारण, रिंगिंग बेल ही भारतीय कंपनी बुधवारी आतापर्यंतचा सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘फ्रिडम २५१’ या स्मार्टफोनची किंमत अवघी २५१ रुपये इतकी असणार आहे.
‘फ्रिडम २५१’ स्मार्टफोनला ४ इंचाची स्क्रिन असणार असून, १.४ Ghz क्वाडकोअर प्रोसेसर असणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनला १ जीबीची रॅम व ८ जीबी इतकी इंटरनल मेमरी असेल. मोबाईलला ३.२ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, तर ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. १४५० mAH क्षमतेची बॅटरी या मोबाईलमध्ये असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’,’डिजीटल इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ या योजनांच्या लक्षात घेऊन देशातील प्रत्येक नागरिकला सक्षम करण्याच्या दृष्टीने हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे.
‘फ्रिडम २५१’ या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोनसाठीची नोंदणी गुरूवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार असून, २१ फेब्रुवारीला म्हणजेच येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी सुरू राहील.
फक्त २५१ रुपयांत स्मार्टफोन!
स्मार्टफोनला १ जीबीची रॅम व ८ जीबी इतकी इंटरनल मेमरी असेल.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-02-2016 at 11:52 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias cheapest smartphone from ringing bells at rs