सरत्या वर्षांने ग्राहकराजाला तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचा प्रयत्न केला. या वर्षभरात अनेक नवीन उत्पादनांची निर्मिती झाली तर अनेक जुन्या गोष्टींना नवे रुप मिळाले. या वर्षभरात तंत्रविश्वाने आपल्याला नेमके काय दिले तसेच भविष्यात काय देणार आहे याचा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑगमेंटिक रिअ‍ॅलिटी

गुगल ग्लासच्या अपयशानंतरही ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या तंत्राला या वर्षांत चांगले यश मिळाले. याचा वापर अ‍ॅपलने त्यांच्या फोनमध्येही केल्यामुळे या तंत्रज्ञानाला एक नवी दिशा मिळाली आहे. ऑगमेंटिक रिअ‍ॅलिटीमुळे एखाद्या छायाचित्रावरून आपल्याला त्या गोष्टीची चलचित्रधारीत माहिती मिळू शकते. तंत्रज्ञानाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही याचा वापर होऊ लागला असून शिक्षणातील तंत्रज्ञान प्रयोगाला यामुळे चालना मिळाली आहे. याचबरोबर सुरक्षा क्षेत्रातही याचा वापर होत आहे.

इंटरनेट ऑफ थिंग्ज

एखाद्या उपकरणाला इंटरनेटची जोडणी करून त्याचे चलनवलन आपल्या हातातील उपकरणाने करणे म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज. २०१४मध्ये याचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ते या वर्षांत अनेक उपकरणांमध्ये दिसू लागले. यामध्ये तंत्रज्ञानामुळे भौतिक आणि डिजिटल जग एकमेकांना जोडणे शक्य होत आहे. याचा वापर घरगुती उपकरणांपासून ते अगदी विमानतळापर्यंत होऊ लागला आहे. याचा प्रयोग नुकताच लंडन शहराच्या विमानतळात करण्यात आला.

वेअरेबल्स

मोबाइलला पर्याय ठरू पाहणाऱ्या वेअरेबल्स उत्पादनांनी २०१५मध्ये ग्राहकांची मने जिंकली. प्रगत देशांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात मात्र अद्याप अशा उत्पादनांकडे लोक फारसे आकर्षित झालेले नाही. अ‍ॅपलने यावर्षीही त्यांचे नवे आयवॉच बाजारात आणले. याचबरोबर वर्षभरात तब्बल २०हून अधिक अँड्रॉइड वेअरेबल बाजारात दाखल झाले. या उत्पादनांना ग्राहक पसंती मिळत असली तरी ती फार तोकडी आहे. मात्र या उत्पादनांनी तंत्रसंशोधनाच्या नव्या कल्पना जगासमोर आल्या आहेत. यात देण्यात आलेले ऑगमेंटिक रिअ‍ॅलिटीवर आधारीत अ‍ॅप वापरून यंत्र दुरुस्ती करण्याचा प्रयोगही तोशिबामधील एका अभियंताने यशस्वी करून दाखविला आहे.

मोबाइलमधून आर्थिक व्यवहार

ऑनलाइन व्यवहार हे या वर्षांसाठी नवे नसले तरी मोबाइलमधून आर्थिक व्यवहार मात्र या वर्षी चांगलेच चर्चेत आले. बडय़ा कंपन्यांची यामध्ये स्पर्धाही लागली होती. अ‍ॅपल पे ला टक्कर देण्यासाठी गुगल वॉलेट बाजारात आले. याचबरोबर पे-टीएम, ए-पैसा यासारख्या अ‍ॅप्सनाही भारतीय बाजारात चांगलीच मागणी मिळत होती. जास्तीत जास्त लोकांनी याकडे वळावे यासाठी त्यांनी विविध ऑफर्सही देऊ केल्यात. हे डिजिटल पाकीट क्रेडीट कार्डस्ना पर्याय ठरला. यामधून होणारे आर्थिक व्यवहार हे सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी विविध कंपन्यांनी अशा अ‍ॅप कंपन्यांशी सहकार्य करून आर्थिक व्यवहाराला एक नवी दिशा दिली. यामुळे या वर्षभरात मोबाइलमधून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांच्या संख्येत दहा टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. याचबरोबर पैशांची देवाण-घेवाणही मोबाइलच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली आहे. यासाठी चिल्लर, पे-पलसारख्या सुविधांचा वापर होत आहे.

information, 2015, technology

पुढील वर्ष हे आभासी सत्यतेवर आधारीत असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये सोनी, सॅमसंग आणि गुगलसारख्या कंपन्या मोठी गुंतवणूक करत आहेत. यापैकी काही उत्पादनांची झलक आपल्याला पाहवयास मिळाली आहे. तर काही उत्पादने नजीकच्या काळात पाहवयास मिळणार आहे. या तंत्रज्ञानातुम्ह व्हिडीओ गेमिंग व्यवसायाला नवा आयाम मिळणार आहे. मात्र याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनातील उपकरणांमध्येही होणार असल्यामुळे आपण या तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ जाणार आहोत.

ऑनलाइन सुरक्षा

सोनीसारख्या कंपनीला नुकतेच सायबर हल्ल्याला समोरे जावे लागल्यामुळे ऑनलाइन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्यांना या वर्षांत सायबर हल्ल्याला सामोरे जावे लागले. यात अनेकद सरकारी संकेतस्थळांचाही समावेश आहे. यामुळे सायबर हल्ले रोखण्यासाठी या वर्षभरात सायबर सुरक्षेवर सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली. कंपन्यांबरोबरच वैयक्तिक पातळीवरही ओळख चोरणे, पासवर्ड चोरणे, बँक खात्याची माहिती चोरणे यासारख्या घटनांमध्येही वाढ होऊ लागल्यामुळे सायबर सुरक्षा कंपन्यांनी विविध स्तरावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

नीरज पंडित

niraj.pandit@expressindia.com