स्मार्टफोनवरील कॅमेऱ्याच्या वाढत्या क्षमतेमुळे प्रत्येक घडामोडीचे चित्रीकरण करण्याकडे कल वाढत चालला आहे. अगदी लग्नसोहळय़ातील ‘कॅण्डीड’ क्षणांपासून घरातल्या घरात झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीपर्यंतच्या घटनांचे या कॅमेऱ्यानिशी ‘व्हिडीओ रेकॉर्डिग’ करण्यात येते. हॅण्डीकॅम किंवा डिजिटल कॅमेऱ्यांनिशी स्वत:च चित्रीकरण करणारेही अनेक आहेत. पण केवळ ‘व्हिडीओ रेकॉर्ड’ करून तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करता येत नाही. त्या आठवणी अधिक खुलवण्यासाठी ‘व्हिडीओ एडिटिंग’ करावेच लागते. सर्वसामान्य वापरकर्ते आपल्याला जमेल त्या पद्धतीने ‘व्हिडीओ एडिटिंग’ करतात किंवा बाजारात कोणत्याही फोटोग्राफरकडे जाऊन व्हिडीओ एडिटिंग केले जाते. मात्र, पहिल्या पद्धतीत व्हिडीओचे संपादन चुकण्याची भीती असते तर दुसऱ्यात पैसे मोजावे लागतात. अशा वेळी संगणकावर उपलब्ध असलेले मोफत पण उपयुक्त व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर एक चांगला पर्याय ठरू शकतात. अशाच काही महत्त्वाच्या ‘व्हिडीओ एडिटर सॉफ्टवेअर’विषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा