एकेकाची मोबाइल फोनच्या मार्केटमध्य अधिराज्य गाजविणारया नोकियाने स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या काळातील स्मार्टफोनची निवड, वेअरेबल डिवाइसबाबत नोकियाची भूमिका अशा मुद्दय़ांवर नोकियाचे विपणन विभागाचे संचालक विरल ओझा यांच्याशी केलेली बातचीत.
* नोकियाने लुमिच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोबईल मार्केटमध्ये आपले नाव प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. नव्या सिरीजबद्दल काय सांगाल.
उत्तर- नोकिया लुमियाला लोकांचा खूप चागला प्रतिसाद मिळत आहेत. लुमियाने नुकतेच लुमिया १३२० आणि लुमिया ५२५ हे फोन बाजारात आणले असून त्यातील एका फोनमध्ये एक जीबी रम देण्यात आला आहे. यामुळे त्याचा वापर अधिक जलद करता येणार आहे. नोकिया आशालाही लोकांनी चागला प्रतिसाद दिला आहे. लुमियातील कॅमेरा आणि त्यातील खास अप्लिकेशन लोकांना आकर्षति करण्याचे काम करीत आहेत. यामुळेच नोकिया लुमियाला चागला प्रतिसाद मिळत आहे.
* सध्या मार्केटमध्ये वेअरेबल वस्तूंची चांगली चालती आहे. आशावेळी नोकिया आशा वस्तू बाजारात आणण्यास तयार आहे का?
उत्तर- नोकिया नेहमी ग्राहकांना काय हवे आहे ते देत आली आहे. भविष्यात आम्ही कोणती उत्पादने बाजारात आणू हे सांगणे आत्ता कठीण आहे. पण ग्राहकांना संशोधनाच्या माध्यमातून नाविन्य दाखविण्यापेक्षा त्यांना जे अपेक्षित आहे ते देणे यावर आमचा भर आहे. लुमियामध्ये विविध संशोधन करून त्यात आणखी सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे सध्याचे उद्दिष्ट आहे.
* स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि इतर फिचर्स अधिक वाढू लागले आहेत नेमकी ग्राहकांची आवड काय आहे.
उत्तर – ग्राहकांना त्यांच्या मोबाइलमध्ये सर्व गोष्टी सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. ती सुविधा स्मार्टफोनमधून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन आम्ही नोकिया म्यापसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामुळे लोकांना फोनवर सर्वकाही उपलब्ध होऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा