आयफोन आणि आयपॅड हेही आता सामान्य घरांमध्ये सहज दिसू लागले आहे. खरेतर या दोन्ही बाबी आपल्याकडे असणे हे स्टेटस सिम्बॉल आहे. किंबहुना म्हणूनच ही उपकरणे ठेवण्यासाठी म्हणजेच डॉक करण्यासाठी बाजारात काही चांगली उत्पादने विविध कंपन्यांनी बाजारात आणली आहेत. त्यात जेबीएल ही कंपनी अ‍ॅपलच्या उत्पादनांच्या बाबतीत आघाडीवर आहे. त्यांनी आणलेले डॉक तुमची उपकरणे तर चार्ज करतेच. पण आठवणीने ती चार्ज झाल्यानंतर तुमच्याच म्युझिक लायब्ररीमधील संगीत ऐकवून त्याची जाणीवही तुम्हाला करून देते. शिवाय एकाच वेळेस संगीत ऐकताना आणखी दुसरे काही काम करावयाचे असेल तर ब्लूटूथचा वापर करून तुम्ही तेही करू शकता.
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. १०,९९०/-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा