मोबाइल गेम्स किंवा एकूणच संगणक गेम्स म्हटले की भडक रंग, वेगवेगळे इफेक्ट्स, हाणामारी, जलद पळणे, जलद गाडी पळवणे अशा एक ना अनेक गेम्सच्या स्क्रीन्स आपल्या डोळय़ासमोरून जातात. या सर्व गेम्समुळे काही चांगले अर्थात ज्या गेम्समध्ये विचार करावा लागतो किंवा जे गेम्स शब्दांशी संबंधित आहेत असे सर्व गेम्स पुरते झाकोळले गेले आहेत. अशा गेम्समध्ये चांगले चित्र आणि आवाज नसतात. मात्र त्या गेम्सच्या माध्यमातून एखादा वैज्ञानिक सिद्धांत असेल किंवा एखादी प्रसिद्ध कथा असेल ती आपल्यासमोर उभी राहते. पाहू या असे काही गेम्स जे आपल्याला मनोरंजनासोबतच थोडंसं डोकं खाजवालाही भाग पाडतात.
लाइफलाइन
विज्ञान क्षेत्रातील टेलर नावाचा एक शिकाऊ उमेदवार आपल्या वरिष्ठांसोबत चंद्रावर जातो. तेथे त्यांचे अंतराळ यान क्रॅश होते. तेथे तो एकटा अडकलेला असतो. मग तो मदतीसाठी पृथ्वीवरील केंद्रावर संपर्क साधतो. त्या वेळेस तुम्ही त्याला मार्गदर्शन करून तेथून सुरक्षितपणे बाहेर काढायचे असते. अशा प्रकारचा एक वेगळाच अनुभव देणारा हा गेम आहे. या गेममध्ये आपण संदेश पाठविण्यासाठी ज्याप्रमाणे शब्दांचा वापर करतो, तशाच प्रकारे शब्दांचा वापर करून टेलरला मार्गदर्शन करायचे असते. तुमच्यासमोर मांडण्यात आलेल्या परिस्थितीतून तुम्ही जे निर्णय घ्याल त्या निर्णयावर टेलरचं जगणं किंवा मृत्यू अवलंबून असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला विज्ञानातील थरारक गोष्ट अनुभवायची असेल तर हा गेम खरोखरच त्यासाठी उत्तम आहे.
अॅप कुठे उपलब्ध – आयओएस आणि अँड्रॉइडवर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा