मोबाइल घ्यायचा म्हटलं की त्याच्या स्पेसिफिकेशन्सच्याही आधी आपण आपले बजेट ठरवतो आणि मग त्यानुसार मोबाइलची निवड करीत असतो. असे करत असताना आपल्याला परवडणाऱ्या मोबाइल्सची यादीच आपल्यासमोर येते. पण त्याचा ब्रँड नावाजलेला नसतो. अशावेळी आपल्या मनात धस्स होतं आणि हा फोन घ्यायचा की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. फोन्सची निवड करत असताना काय काळजी घ्यायची, ते काही पर्याय आज आपण पाहू या.
भारतात मोबाइलचा वापर वाढत आहे हे काही नव्याने सांगणे गरजेचे नाही. पण यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे अनेक भारतीय कंपन्या मोबाइल उत्पादन क्षेत्रात उतरल्या. याचा फायदा असा झाला की मोबाइलच्या किमती कमी झाल्या. यामुळे सामन्यांच्या खिशातही जास्त सुविधा असलेला मोबाइल दिसू लागला. आंतरराष्ट्रीय माहिती मंडळाने संकलित केलेल्या माहितीनुसार भारतीय ब्रँडची विक्री गेल्या वर्षांत कमालीची वाढली आहे. भारतीय कंपन्या मायक्रोमॅक्स आणि कार्बन यांनी सन २०१३ मध्ये मोबाइल मार्केटमध्ये ३२ टक्के आपला वाटा नोंदविला आहे. यामुळे बडय़ा कंपन्यांच्या स्थानाला काही धक्का बसला नसला तरी त्यांची विक्री मात्र कमी झाली आहे. याच भारतीय कंपन्या येत्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस ४ मध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मायक्रोमॅक्सच्या कॅन्व्हास एचडीमध्ये मिळतात. याची किंमत १५ हजापर्यंत असल्यामुळे जास्त सुविधा आणि कमी पसे अशी गणिते असलेले ग्राहक मायक्रोमॅक्सचा पर्याय स्वीकारतात. यामध्ये सध्या कार्बन, लावा, इंटेक्स, आयबॉल, झोलो, सेलकोन, जोश अशा कंपन्याही बाजारात आल्या आहेत. त्यांचेही विविध फोन मार्केटमध्ये येत असल्यामुळे अनेकांना ते पर्यायही योग्य वाटत आहेत. हे सर्व पर्याय चिनी मोबाइलपेक्षा चांगले असतात. या कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात अगदी तीन ते चार हजार रुपयांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यामुळे सध्या आपल्यला स्वस्त आणि मस्त असे फोन उपलब्ध झाले आहेत.
भारतीय बाजारपेठ ही किमतीवर चालणारी आहे. हे लक्षात घेऊन भारतीय कंपन्यांनी चांगल्या सुविधा असलेले मोबाइल स्वस्तात उपलब्ध करून दिले आहेत. हे मोबाइल स्वस्त आहेत म्हणून ते चांगले नाहीत असा अनेकांचा समाज असतो. हे काही प्रमाणात सत्य असले तरी ज्यांना जास्त पसे खर्च करावयाचे नसतील त्यांच्यासाठी हे पर्याय अगदी वाईटही ठरत नाहीत. या कंपन्यांचे फोन २० हजार रुपयांत आपल्याला ४० हजार रुपयांचा फोन वापरात असल्याचे भासवतात. म्हणजे तशा ९९ टक्के सुविधा या फोन्समध्ये असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा