फिलिप्स या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविणाऱ्या कंपनीने मोबाईल फोन क्षेत्रातदेखील प्रवेश केला असून, त्यांनी खास ज्येष्ठांसाठी म्हणून ‘झेनियम एक्स२५६६’ हा मोबाईल फोन बाजारात आणला आहे. मोठा डिस्प्ले आणि २.४ इंचाच्या स्क्रिनवर दिसणारा मोठा फॉण्ट असे वैशिष्ट्य असलेल्या या फोनची किंमत ३८०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. फोनच्या की-पॅडवरदेखील मोठ्या अक्षरातील आणि अंकातील किज् देण्यात आल्या आहेत. १६३० एमएएच बॅटरी आणि पॉवर सेव्हिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेल्या या फोनमध्ये ११२८ तासांचा स्टॅण्डबाय कालावधी, तर २४ तासांचा टॉकटाईम मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. एफएम रेडिओ, मोठ्या आवाजातला लाऊडस्पीकर आणि सुस्पष्ट आवाजासाठीचा इअरपिस या फोनमध्ये पुरविण्यात आला आहे. हा फोन खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बनविण्यात आल्या कारणाने ज्येष्ठांना संकटसमयी जवळच्या माणसांना जलद आणि सहज संपर्क साधता यावा यासाठी ‘एसओएस’ सुविधा पुरविण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करून संकटसमयी जवळच्या तीन माणसांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करता येतो. याचा वापर करण्यासाठी फोनमध्ये ‘एसओएस’ नावाचे बटन पुरविण्यात आले आहे. हे बटन फोनमधील फ्लॅशलाईट खाली दडवून ठेवण्यात आले आहे. संकटसमयी ‘एसओएस’ बटन दाबताच यात सेव्ह केलेल्या तीनही फोन नंबरपैकी कोणत्या ही एकाकडून प्रतिसाद येत नाही तोपर्यंत मोबाईलफोनकडून या तीनही क्रमांकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो.
फिलिप्सने आणला ज्येष्ठांसाठीचा मोबाईल फोन
फिलिप्स या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनविणाऱ्या कंपनीने मोबाईल फोन क्षेत्रातदेखील प्रवेश केला असून, त्यांनी खास ज्येष्ठांसाठी म्हणून 'झेनियम एक्स२५६६' हा मोबाईल फोन बाजारात आणला आहे.
First published on: 21-10-2014 at 02:12 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Launch philips xenium x2566 is ideal for senior citizens