ऊर्जाबचत ही भविष्यातली मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत विजेची बचत करणारया उत्पादनांची एक मोठी बाजारपेठनिर्माण झाली आहे. अगदी साध्या बल्बपासून फ्रीज-टीव्हीपर्यंत अनेक ‘एनर्जी एफिशियंट’ उत्पादने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या उत्पादनांना केंद्र सरकारने करांत किंवा अनुदानाच्या रुपात सवलतही दिली आहे. अशाच उत्पादनांच्या यादीत समावेश होणारा पण तरीही गॅझेट्सच्या वर्गवारीतच मोडणारा ‘लिफ्स’ बल्ब या महिन्यात भारतीय बाजारात दाखल होत आहे. सर्वसाधारण बल्बच्या तुलनेत अवघी 10 टक्के वीज वापरणारा, 25 वष्रे टिकणारा, विविधरंगी प्रकाश देणारा हा एलईडी बल्ब म्हणजे एक आष्टद्ध१(155)र्यच आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे, हा बल्ब वाय-फायच्या मदतीनेही हाताळता येऊशकतो. अँड्राइड किंवा आयफोनमध्ये या बल्बशी संबंधित अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही बसल्या जागेवरून हा बल्ब बंद चालू करू शकता. शिवाय, त्याचा प्रकाश कमी करणं, वेगळय़ा रंगाचा प्रकाश सुरू करणं आणि टायमर लावून बल्ब आपोआप बंद करणं, या गोष्टी करता येतात. सर्वसाधारण बल्बच्या होल्डरमध्ये बसणारया बल्बसाठी वेगळे उपकरण बसवण्याची गरज नाही. घरात कितीही लिफ्स बल्ब बसवले असतील तरी, ते एकाच स्मार्टफोनवरून वेगवेगळे हाताळता येऊशकतात.  विशेष म्हणजे, या बल्बमधील इंटरनेट सुविधेमुळे प्रत्येक मोसमानुसार त्याच्या प्रकाशाच्या तीव्रतेत आपोआप फरक होतो.
तसं पाहिल्यास इंटरनेटवर आधारीत बल्ब म्हणून लिफ्स नवा नाही. याआधी फिलिप्सने ‘’ाु’ हा बल्ब बाजारात आणला होताच. परंतु, लिफ्स अनेक बाबतीत वेगळा व दर्जेदार आहे. प्रत्येक बल्बमध्ये स्वत:ची वायफाय चिप, एलईडी आणि हिट सिंक असल्याने तो हाताळण्यासाठी वेगळे उपकरण बसवण्याची गरज नाही. सर्वसाधारण बल्ब एक हजार तास चालू शकतो. सध्या मोठय़ा प्रमाणात चलती असणारे सीएफएलचे बल्ब 12 हजार तास तर फिलिप्सचा ‘ाू 15 हजार तास चालू शकतो. मात्र, लिफ्स तब्बल 40 हजार तास प्रकाश देऊशकतो, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, या बल्बची घसघशीत किंमत भारतीय बाजारात त्याला किती ग्राहक मिळवून देईल, याबाबत शंका आहे.
किंमत अंदाजे ४७०० रुपये प्रति

Story img Loader