ऊर्जाबचत ही भविष्यातली मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत विजेची बचत करणारया उत्पादनांची एक मोठी बाजारपेठनिर्माण झाली आहे. अगदी साध्या बल्बपासून फ्रीज-टीव्हीपर्यंत अनेक ‘एनर्जी एफिशियंट’ उत्पादने सध्या बाजारात उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या उत्पादनांना केंद्र सरकारने करांत किंवा अनुदानाच्या रुपात सवलतही दिली आहे. अशाच उत्पादनांच्या यादीत समावेश होणारा पण तरीही गॅझेट्सच्या वर्गवारीतच मोडणारा ‘लिफ्स’ बल्ब या महिन्यात भारतीय बाजारात दाखल होत आहे. सर्वसाधारण बल्बच्या तुलनेत अवघी 10 टक्के वीज वापरणारा, 25 वष्रे टिकणारा, विविधरंगी प्रकाश देणारा हा एलईडी बल्ब म्हणजे एक आष्टद्ध१(155)र्यच आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे, हा बल्ब वाय-फायच्या मदतीनेही हाताळता येऊशकतो. अँड्राइड किंवा आयफोनमध्ये या बल्बशी संबंधित अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही बसल्या जागेवरून हा बल्ब बंद चालू करू शकता. शिवाय, त्याचा प्रकाश कमी करणं, वेगळय़ा रंगाचा प्रकाश सुरू करणं आणि टायमर लावून बल्ब आपोआप बंद करणं, या गोष्टी करता येतात. सर्वसाधारण बल्बच्या होल्डरमध्ये बसणारया बल्बसाठी वेगळे उपकरण बसवण्याची गरज नाही. घरात कितीही लिफ्स बल्ब बसवले असतील तरी, ते एकाच स्मार्टफोनवरून वेगवेगळे हाताळता येऊशकतात. विशेष म्हणजे, या बल्बमधील इंटरनेट सुविधेमुळे प्रत्येक मोसमानुसार त्याच्या प्रकाशाच्या तीव्रतेत आपोआप फरक होतो.
किंमत अंदाजे ४७०० रुपये प्रति
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा