अॅपल आयपॅड एआयआर : अतिशय हलका आणि अद्भुत शक्ती
अतिशय लहान, चपटा आणि आकर्षक असे टॅब्लेट काढण्याची आपली परंपरा अॅपलने कायम राखली आहे. ९.७ इंची डिस्प्ले, आणि वजन अवघे ४६९ ग्रॅम असे हे उपयुक्त, वाहून नेण्यास सुलभ पॅकेज आहे. अॅपलचा नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा ‘ए-७’ प्रोसेसर या आयपॅडमध्ये वापरण्यात आला आहे. या प्रोसेसरची गती आधीच्या ए-६च्या तुलनेत दुप्पट आहे. सुमारे १० तासांचे बॅटरी बॅकअप, १६ जीबी क्षमता आणि वायफाय सुविधा असलेल्या या आयपॅडची किंमत ३५ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते. त्याशिवाय, अॅपलने ‘आयपॅड मिनी’सुद्धा बाजारात आणायचे ठरविले आहे. यामध्ये, ए-७ प्रोसेसर असून याची किंमत २८ हजार ९०० रुपयांपासून सुरू होते.
मूल्य : ३५,९००/-
गुगल नेक्सस ७ फ्लॅगशीप अँड्रॉइड टॅब्लेट
भारतीय बाजारपेठेमध्ये किरकोळ विक्रीसाठी हा टॅब्लेट उपलब्ध झाला आहे. ७ इंची डिस्प्ले. १.४ गिगा हर्टझ् क्वाड कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एस ४ प्रो प्रोसेसर, २ जीबी रॅम, आणि ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल अशी मेमरी ही या टॅब्लेटची वैशिष्टय़े आहेत. अॅससने १० तासांच्या बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे. ५ मेगापिक्सेल कॅमेरा आणि १.२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा या टॅब्लेटला उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३२ जीबी मेमरी असलेल्या थ्रीजी मॉडेलची किंमत २७,९९९/- तर, वायफाय सुविधेवर चालणाऱ्या मॉडेलची किंमत २०,९९९/- इतकी आहे.
मूल्य : २०,९९९/-
कार्बन टिटॅनियम एक्स
स्मार्टफोनच्या आपल्या उत्पादनांमधील सर्वात अद्ययावत उत्पादन असे नावजात कार्बनने टिटॅनियम एक्स हा फोन बाजारात आणला आहे. अँड्रॉइड ४.२ जेली बिन ही ऑपरेटिंग सिस्टिम यात असून, १.५ गिगा हर्टझ् क्षमतेचा क्वार्टझ् कोअर प्रोसेसर यात बसविण्यात आला आहे. रॅम १ जीबी, १६ जीबी स्टोरेज क्षमता, पेन ड्राईव्ह प्लग इन्ची सुविधा अर्थात ‘यूएसबी ऑन द गो’ सुविधा, १३ मेगापिक्सेल कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आदी सुविधांचा समावेश, शिवाय, प्रॉक्झिमिटी सेन्सर, अॅक्सेलरोमीटर, मॅग्नेटिक सेन्सर आणि लाइट सेन्सरही स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मूल्य : १८,४९०/-
क्रिएटिव्ह टी ४
वायर फ्री ऑडिओ सुविधा सध्या बाजारपेठेत वायरफ्री स्पीकर्सचे पीक आले आहे. सामान्यपणे आजवर बाजारात आलेले वायरफ्री स्पीकर्स हे प्रवासात आपल्याबरोबर नेता येत असत. मात्र आता
फुल-साइझचे स्पीकर्स वायरफ्री पद्धतीने उपलब्ध झाले आहेत. अशांपैकीच टी ४ हे स्पीकर्स आहेत. हे स्पीकर्स ब्ल्यू – टूथ आणि एनएफसी (नियर फिल्ड कम्युनिकेशन – अल्प अंतरावरील संदेशवहन) तंत्रज्ञानावर चालतात. याशिवाय क्रिएटिव्हने टी-३० हे स्पीकर्सही बाजारात आणले आहेत. यामध्ये उच्च क्षमतेची बास सुविधा आणि हेडफोनद्वारे कानाला लावून ऐकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे याचे मूल्यही केवळ १३,९९९ रुपये आहे. याच पद्धतीचे पण एनएपसी सुविधा नसलेले टी-१५ हे स्पीकर्सही अवघ्या ६,९९९ रुपयांना उपलब्ध आहेत.
मूल्य : २९,९९९/-
एचटीसी डेझायर ५०१ रंगीबेरंगी पॅटर्न असलेला फोन
सध्या रंगीबेरंगी फोन मॉडेल्सना चलती आलेली असताना, एचटीसीनेही या स्पर्धेत उतरायचे ठरविले आहे. डेझायर ५०१ या नव्या मॉडेल्सद्वारे त्यांनी रंगीबेरंगी मोबाईलची आधुनिक रेंज बाजारात आणली आहे. हिरवा, तपकीरी आणि मंद निळा अशा तीन रंगांमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवाय याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये एकाच वेळी दोन सिमकार्ड अॅक्टिव्हेट ठेवण्याची सुविधा आहे. चार इंची स्क्रीन, १ जीबी रॅम, १.५ गिगा हर्टझ् डय़ुअल कोअर प्रोसेसर, ३२ जीबीपर्यंत वाढविता येणारी मेमरी ८ मेगापिक्सेल कॅमेरा आणि २.१ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा ही या फोनची आणखी काही वैशिष्टय़े.
मूल्य : १६८९०/-