मार्टनि केलस्ट्रोम हा हरहुन्नरी तंत्रज्ञ तरुण असताना त्याचे आईवडील कर्करोगाच्या आजाराने मरण पावले. ‘अगदी तरुण वयात आईवडिलांना गमावल्यानंतर मृत्यू हे अटळ सत्य आहे, याची जाणीव आपल्याला झाली. आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे, याचेही भान आले. त्यामुळे जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाला साठवून ठेवणारा ‘मेमोटो’ कल्पनेतून साकारला,’ असे मार्टनि म्हणतो. मार्टनिच्या शोधामागचं हे तत्व आपल्यातल्या प्रत्येकालाच लागू पडतं. त्यामुळेच येत्या काळात भारतीय बाजारांत दाखल होत असलेला मेमोटो कॅमेरा या आठवणींचा साक्षीदार ठरू शकतो. सर्वसामान्य कॅमेरयांपेक्षा वेगळा असा हा मेमोटो कॅमेरा म्हणजे, जवळपास साडेतीन सेमी लांबी-रुंदी असलेली एक छोटीशी डबीच आहे. या डबीच्या एका कोपरयात पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा बसवण्यात आला आहे. हे उपकरण खिशाला अडकवून अथवा गळय़ात नेकलेससारखे लावून आपल्या आपल्या दिवसभरातील वेगवेगळय़ा घडामोडींचे विनासायस चित्रिकरण अथवा छायाचित्रे काढता येतात. यामधील बॅटरी दोन दिवस चालू शकते, असे हे बनवणारया कंपनीचा दावा आहे. हा कॅमेरा दर 30 सेकंदाने आपल्या समोरील दृश्य छायाचित्रांच्या रुपात टिपत असतो. याशिवाय आपल्याला हवे तेव्हाच आपण यातून छायाचित्रे टिपू शकतो. या कॅमेरयाला यूएसबी पोर्ट देण्यात आला असून त्याद्वारे ही छायाचित्रे आपण कम्प्युटरवर अपलोड करू शकतो. या कॅमेरयाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, यात बसवलेली जीपीएस यंत्रणा छायाचित्रांसोबतच ती काढलेली ठिकाणे आणि वेळ यांचीही नोंद करून ठेवते. अ‍ॅण्ड्राइड आणि आयफोनमध्ये या कॅमेरयाशी संबंधित अ‍ॅप्सही सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रसंगांचे कुणाच्याही नकळत चित्रण करायचे असेल तर, मेमोटो एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
खासगीपणात ढवळाढवळ?
मेमोटो कॅमेरा हा ‘लाइफलॉिगग’ म्हणजेच ‘जीवनचित्रण’ करणारा असल्याचे कंपनीचे म्हणणे असले तरी हा आपल्या व आपल्या भोवतालच्या व्यिक्तच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचाच प्रकार असल्याची ओरड होत आहे. या कॅमेरयाचा वापर हेरगिरीसाठी किंवा ब्लॅकमेिलगसाठीही केला जाऊशकतो, अशीही भीती आहे. मात्र, कंपनीच्या मते, हा कॅमेरा म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रसंगाची साठवण करणारे उपकरणच आहे.
किंमत १६५०० रुपये अंदाजे.

Story img Loader