सकाळी उठण्यासाठी पूर्वी गजराचे घडय़ाळ होते. त्याची जागा आता संगीतमय अशा अलार्म असलेल्या घडय़ाळांनी घेतली आहे. आता हे सारे इलेक्ट्रॉनिक रूपात येते आहे. या क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी असलेल्या जेबीएल या कंपनीने अशीच काही चांगली इलेक्ट्रॉनिक अलार्म असलेली घडय़ाळे बाजारात आणली आहेत. पण ही काही केवळ घडय़ाळे नाहीत तर ती बहुपयोगी अशी आयपॅड डॉक्स आहेत. यातील एक नवे बाजारात आलेले उत्पादन म्हणजे ‘ऑन बीट अवेक’.
हे तुम्हाला तुमच्या पलंगाजवळ ठेवता येईल. तुम्ही झोपलेले असताना तुमचे आयपॅड चार्ज करण्याचे कामही ते करू शकेल. आणि त्याचवेळेस तुम्ही निश्चित केलेल्या वेळेवर तुम्ही ठरविलेले संगीत किंवा गाणे ऐकवून तुम्हाला उठवण्याचे कामही ते करेल. तुम्ही तुमच्या उपकरणातील म्युझिक लायब्ररी यावर सेट करून ठेवू शकता. शिवाय तुम्हाला वाटलेच की, त्यावर बातम्या पाहायच्या किंवा सिनेमा पाहायचा आहे तर सिस्टिमद्वारे ब्लूटूथच्या मार्फत कनेक्ट करून ती इच्छाही तुम्ही पूर्ण करू शकता.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १०,९९०/-