टचस्क्रीनने बटणांची कटकट कमी केली. मोबाइलमधील बटणांची जागा टचस्क्रीनने व्यापली, त्यामुळे मोबाइलला मोठी स्क्रीन मिळाली. त्याशिवाय टचस्क्रीनमुळे केवळ एका बोटाच्या साहाय्याने आपण मोबाइलमधील कोणत्याही फंक्शनला भेट देऊ शकतो. मात्र टचस्क्रीनच्या पुढील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, तुमचा आवाज..
म्हणजे??
आश्चर्यचकित झालात ना. तुम्ही आता मोबाइलच्या स्क्रीनला स्पर्शही न करता केवळ तुमच्या आवाजाच्या साहाय्याने मोबाइल ऑपरेट करू शकता. मोटोरोला या कंपनीच्या ‘मोटो एक्स’ या मोबाइलने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. परदेशात उपलब्ध असलेला हा अत्याधुनिक मोबाइल आता भारतात आला आहे. या मोबाइलला स्पर्श न करता केवळ आवाजाच्या साहाय्याने दिशा दाखवा, तो तुम्हाला पाहिजे त्या फंक्शनला भेट देण्यास मदत करील. तुम्हाला जर अलार्म लावायचा आहे किंवा मोबाइलमधील वेळ व तारीख बदलायची आहे, तर तसे तुम्ही त्याला सांगा. तो आपोआप तुमचे म्हणणे ऐकेल आणि त्याप्रमाणे कृती करील. जर तुम्ही म्हणाला : ‘ओके गुगल नाऊ’ तर हा मोबाइल लगेच तुम्हाला गुगल उपलब्ध करून देईल.
तुम्ही राहत असलेल्या परिसरातील हवामान तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, मग ‘मोटो एक्स’शी बोला, तो तुम्हाला त्याची माहिती तात्काळ उपलब्ध करून देईल. तुम्हाला कशाची गरज आहे किंवा काय हवे आहे, हे मोटो एक्सशी बोलल्यानंतर तो त्याप्रमाणे कृती करण्यास नेहमीच तयार असतो. मात्र ‘मोटो एक्स’ तुम्हाला महत्त्वाची माहितीची उपलब्ध करू शकतो, जी त्यामध्ये डाऊनलोड असते. मात्र अन्य माहिती उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला या मोबाइलच्या टचस्क्रीनचा वापर करावा लागेल.
कॅमेरा – मोटोरोलाच्या या मोबाइलमध्ये एक आकर्षक कॅमेराही आहे. या मोबाइलच्या स्क्रीनला कुठेही स्पर्श करा, लगेच कॅमेरा सुरू होतो. मग तुम्ही त्याद्वारे छायाचित्रणाचा आनंद घेऊ शकता. या मोबाइलमध्ये १० मेगापिक्सल कॅमेरा उपलब्ध आहे.
‘गुगल क्रोम’ उपलब्ध – मोटोरोला गुगल क्रोमशी कनेक्ट करण्यात आलेला आहे. या मोबाइलच्या डेस्कटॉपवर उजव्या बाजूला तुम्हाला गुगल क्रोम दिसेल. त्याद्वारे तुम्ही इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या जुन्या मोटो एक्स मोबाइलमधील माहिती नव्या मोटो एक्स मोबाइलमध्ये वाय-फायच्या मदतीने घेऊ शकता. ही सुविधा केवळ मोटो एक्समध्येच उपलब्ध आहे.
कुठे मिळू शकेल? – काळा किंवा पांढरा अशा दोन रंगांच्या शेडमध्ये हा मोबाइल उपलब्ध आहे. या मोबाइलची किंमत २३,९९९ रुपये असून, १९ मार्चपासून तो उपलब्ध करण्यात आला आहे.Flipkart.com वरही हा मोबाइल उपलब्ध करून देण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात अजून तीन वेगवेगळय़ा रंगांत मात्र याच किमतीत तो आपल्याला मिळू शकेल. <चेरी रेड, रॉयल ब्लू आणि पोपटी> अधिक माहितीसाठी http://www.motorola.in/ येथे भेट द्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा