जेवढे पैसे अनेक जण स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांवर खर्च करतात त्याहीपेक्षा अनेक पटींनी अधिक पैसे अनेकदा म्युझिक सिस्टिमवर खर्च केले जातात. त्यातील प्रत्येकालाच गाणे कळते, किंवा संगीत समजते असे नाही. पण संगीताचा आनंद लुटण्याची वृत्ती मात्र अनेकांमध्ये असते. आणि त्या सुश्राव्य आवाजासाठी अधिक पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी असते.
सुश्राव्य संगीताच्या अशा रसिकांसाठी एलजीने आता एक चांगली म्युझिक सिस्टिम बाजारपेठेत आणली आहे. याचे आऊटपूट २३०० वॅटस् आरएमएस आणि २५००० वॅटस् पीएमपीओ क्षमतेचे आहे. सीएम९७३० असे या मॉडेलचे शीर्षक असून यामध्ये एक चांगली क्षमता एलजीने या सिस्टिमला प्राप्त करून दिली आहे. अलीकडच्या पिढीमध्ये सर्वाधिक वेड आहे ते डीजेचे. अनेकांना स्वतहून वेगळे प्रयोग करत डीजे मिक्सिंग करायला आणि त्यातून नवे काही तरी निर्माण करायला आवडते. अशा पिढीसाठी ही अगदी सुयोग्य अशी सिस्टिम आहे कारण यामध्ये प्रोफेशनल पद्धतीने डीजे मिक्सिंग करण्याची सोय कंपनीने दिली आहे. संगीतप्रेमींसाठी ही चांगली पर्वणीच आहे. यामध्ये पाच प्रकारे व्हॉइस इफेक्टस्, ६ सहा प्रकारचे बीट बॉक्स इफे क्टस् आणि ७ प्रकारचे डीजे इफेक्टस् यांचा समावेश करण्यात आला आहे. सिस्टिममध्ये असलेल्या दोन जॉग डायल्सच्या माध्यमातून हे इफेक्टस् मिळवता येतात.
अलीकडे संगीत हा काही केवळ म्युझिक सिस्टिमवरून ऐकण्याचा प्रकार राहिलेला नाही. ते स्मार्टफोनसारख्या अनेक स्मार्ट उपकरणांच्या मार्फत ऐकले जाते. त्यामुळे अशा उपकरणांच्या सोप्या जोडण्यांची सोय नव्या उपकरणांना किंवा म्युझिक सिस्टिमला आहे किंवा नाही हे आवर्जून पाहिले जाते. या म्युझिक सिस्टिममध्ये अशा प्रकारची सोय देण्यात आली आहे. त्यासाठी ब्लूटूथ, स्मार्टफोन किंवा टॅब्लेट यापैकी कोणत्याही बाबींचा वापर करता येऊ शकेल. नव्या पिढीला आवडेल अशीच ही म्युझिक सिस्टिम आहे. भारतीय बाजारपेठेतील किंमत उपलब्ध होऊ शकली नाही.
म्युझिक सिस्टिम डीजे इफेक्टसह
जेवढे पैसे अनेक जण स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांवर खर्च करतात त्याहीपेक्षा अनेक पटींनी अधिक पैसे अनेकदा म्युझिक सिस्टिमवर खर्च केले जातात. त्यातील प्रत्येकालाच गाणे कळते, किंवा संगीत समजते असे नाही. पण संगीताचा आनंद लुटण्याची वृत्ती मात्र अनेकांमध्ये असते. आणि त्या सुश्राव्य आवाजासाठी अधिक पैसे मोजण्याचीही त्यांची तयारी असते.
आणखी वाचा
First published on: 01-06-2013 at 04:05 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music system with dj effects