आता स्मार्टफोन्ससाठी भारतीय खाद्य पदार्थाशी संबधित नवीन अ‍ॅप्स विकसित करण्यात आली आहेत. त्यात स्वीट अ‍ॅण्ड स्पायसी इंडियन अ‍ॅप्सचाही समावेश आहे..
विदेशामध्ये कुठेही जाताना जीपीएसचा वापर प्रामुख्याने केला जातो. मात्र भारतात आजहबी तयाचा फारसा वापर होत नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये जीपीएस अशलेल्या स्मार्टफोन,ची संख्या वाढल्यानंतर मात्र आता येणाऱ्या काळात जीपीएसवर आधारलेल्या नकाशांच्या आधारे शहर किंवा देश भटकंतीचा प्रकार वाढेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आज सर्वाधिक वापरले अ‍ॅप्स म्हणजे माय सिटी वे इंडिया.
सध्या भारतीय शहरांसाठी हे अ‍ॅप्स अधिक चांगल्या प्रकारे काम करते, असा अनुभव आहे. शहरांचासडेटाबेस चांगला आहे. मात्र निमशहरी भागांच्या बाबतीतचा डेटाबेस अधिक चांगला होणे खूप गरजेचे आहे. अ‍ॅप्स विकसित करणाऱ्यांतर्फे दोन्हीं बाबतचे काम सध्या खूप मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या सहा महिन्यांत ते अधिक चांगल्या स्वरूपात आपल्या समोर येईल, अशी अपेक्षा आहे. अ‍ॅप्स अपडेट करण्याचे काम दररोज सुरच असते.
हे अ‍ॅप्स ब्लॅकबेरी, अँड्रॉइड आणि आयफोन तिन्हींसाठी उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा