स्वस्त आणि मस्त फोनची संकल्पना सध्या भारतात चांगलीच रुजू लागली आहे. हेच लक्षात घेऊन बडय़ा कंपन्यांनीही स्वस्त फोन बाजारात आणले आहेत. यामुळे ही स्पर्धा अधिकच वाढू लागली आहे. या स्पध्रेच्या संदर्भात नोकिया इंडियाचे विपणन विभागाचे संचालक विरल ओझा यांच्याशी केलेली बातचीत.
– स्वस्त किंवा परवडणारे फोन भारतीय ग्राहकांची गरज भागवू शकतात का?
सध्याच्या ग्राहकाला फोनच्या मूलभूत वापरापेक्षा अधिक पर्याय असणे अपेक्षित असते. परवडणाऱ्या फोनच्या विभागातही ग्राहकांची हीच अपेक्षा आहे. ग्राहकांना यामध्ये चांगला कॅमेरा, डिस्प्ले, बॅटरीची जास्त क्षमता आणि आधुनिक ऑपरेटिंग सिस्टीम या चांगल्या सुविधा असणे अपेक्षित असते. यामुळेच गेल्या काही वर्षांपासून नोकियासारख्या कंपन्याही याकडे जास्त लक्ष देऊ लागल्या आहेत. नोकियाने एक्सएलमध्ये दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि पाच मेगापिक्सेलचा रेअर कॅमेरा दिला आहे. लुमिया ५२०मध्येही अशाच सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये विंडोज ८.१ ही ऑपरेटिंग सिस्टीमही देण्यात आली आहे. यामुळेच या फोन्सना ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
– नोकियाने साडेचार हजार रुपयांपासूनचे फोन बाजारात आणले आहेत. यातील कुठल्या प्रकारातील फोनला भारतीय ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली आहे?
ग्राहक हे त्यांच्या पैशांना विशेष मोल देतात. यामुळे ते मोजत असलेल्या पैशांमध्ये कोणता चांगल्यात चांगला फोन मिळू शकतो, हे ते पाहत असतात. यामुळे मायक्रोसॉफ्ट डिवाइसने परवडणाऱ्या दरात मोबाइल फोन बाजारात आणण्याचे ठरविले आहे. या वर्षांत नोकिया एक्सची मालिका बाजारात आणली. ज्यामध्ये ग्राहकांना अँड्रॉइड अ‍ॅपचे विश्व खुले झाले. यामध्ये ग्राहकांना नोकिया आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांची सेवा मिळाली. असेच काहीसे चित्र लुमियाच्या बाबतीत आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम अससेला हा फोन परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्याने तोही ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नोकिया एक्स हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा विकला गेलेला स्मार्टफोन ठरला आहे.
– देशात नोकियाच्या तुलनेत इतर कंपन्यांचे मार्केट मोठे आहे. या स्पध्रेत नोकिया स्पर्धा करू शकेल का?
चांगल्या दर्जाच्या उपकरणांची निर्मिती करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट डिवाइस कटिबद्ध आहे. यामुळे भविष्यातही चांगल्या दर्जाची उपकरणे बाजारात आणली जातील. भविष्यातही ग्राहकांना जे आवश्यक आहे ते आम्ही देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. परवडणारी उपकरणे बाजारात उपलब्ध करून देणे ही आमच्यासाठी संधी असेल. नोकियाच्या नवीन उपकरणांमध्ये देण्यात आलेल्या विविध सुविधा ग्राहकांना अधिक आकर्षित करतील.
– मायक्रोसॉफ्टमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर कंपनीच्या धोरणांत काही बदल झाले का?
मायक्रोसॉफ्टमध्ये विलिनीकरणानंतर कंपनीच्या धोरणात कोणतेही बदल झाले नाहीत. नोकिया पूर्वीप्रमाणेच काम करत आहे.
– भविष्यात नोकियाकडून ग्राहकांना काय नवी गोष्ट मिळू शकेल?
स्मार्ट उपकरणांमध्ये वाढ करण्याकडे आमचे लक्ष आहे. सध्या सुरू असलेली विक्री आणि सेवा या दोन्ही गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. एक कंपनी म्हणून चांगले उपकरण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय राहणार आहे. या उपकरणाच्या वापरामुळे लोकांना मोबाइल पूर्णपणे एन्जॉय करता येईल. तसेच स्वस्तात चांगल्यात चांगले फोन कसे उपलब्ध करून देता येतील यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. वेगवेगळे बजेट असेलेल्या व्यक्तींना फोन कसे उपलब्ध होतील, यासाठी वेगवेगळय़ा किमतीतील फोन आम्ही बाजारात आणणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा