ह्ल्ली बघावं त्याच्या हातात स्मार्टफोन दिसतो आणि अनेकजण सतत या स्मार्टफोनला चिकटलेली दिसतात. अगदी अन्नपाणी विसरून त्यांचे स्मार्टफोनवर काहीनाकाहीतरी चाललेले असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याची दखल घेत एका भारतीय जोडप्याने ‘ब्रेकफ्री सेल फोन अॅडिक्शन’ या नव्या अॅपची निर्मिती केली आहे. हे अॅप फोनवापरकर्त्याने फोनवर घालवलेल्या वेळेची नोंद ठेवते आणि त्याला फोनपासून काही काळासाठी दूर राहण्याची आठवण करते. या अॅपद्वारे फोन वापरकर्त्याने फोनवर घालवलेल्या वेळेची, किती वेळा फोन अनलॉक केला याची आणि किती वेळा फोनवरून कॉल केला याची नोंद ठेवली जाते. या नोंदीच्या आधारे फोनच्या वसनाचे गुणांकन केरण्यात येत असल्याचे ‘माशाबेल’च्या वृत्तात म्हटले आहे. याशिवाय तुम्ही एखादे विशिष्ट अॅप जास्त वेळ वापरत असाल, खूप फोन कॉल करत असाल आणि तासाभरापेक्षा जास्तवेळ फोनचा वापर झाला असेल तर हे अॅप तुम्हाला फोनचा जरा कमी वापर करण्याचा सल्ला देते. हे अॅप ‘मोबिफोलीओ’ सॉफ्टवेअर कंपनीचे म्रिगेन कपाडिया आणि त्यांची पत्नी नुपूर कपाडिया यांनी तयार केले असून, नुपूर ही ‘मोबिफोलीओ’ची सहसंस्थापकदेखील आहे. या अॅपमध्ये इंटरनेटचा वापर बंद करणे, फोन कॉल नाकारणे आणि ऑटो टेक्स्ट मेसेजिंगसारख्या सुविधादेखील पुरविण्यात आलेल्या आहेत. ‘ब्रेकफ्री’ अॅप आपल्या मुलांच्या फोनमध्ये इन्टॉलकरून पालक मुलांच्या फोन वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी करू शकतात. या सुविधेद्वारे पालक मुलांच्या फोन आणि इंटरनेट वापराच्या कालावधीवर लक्ष ठेवू शकतात.