लेनोव्हा आयडियापॅड झेड५१०

किंमत : ५२,९५४ रु.
लेनोव्हा कंपनीने स्टायलिश डिजाइन असलेला आणि विविध फिचर्सने परिपूर्ण असलेला एक नोटबूक बाजारात आणले आहे. आयडियापॅड झेड५१० असे नाव असलेल्या या नोटबूकचे वजन केवळ २.२ किलोग्रॅम असून, त्यात १५.६ इंच एचडी एलईडी अँटी ग्लेर डिस्प्ले आहे. सोबतीला जेबीएल स्पीकर आणि डॉल्बी होम थिएटर. त्यामुळे प्रत्येकाला हे नोटबूक हवेहवेसे वाटेल.
इतर फीचर्स :
फोर्थ जनरेशन इंटेल कोअर आय५ किंवा आय७ प्रोसेसर.
संपूर्ण चार्ज केलेली बॅटरी तब्बल सहा तास चालणार.
पांढरी चौकट असलेला की-बोर्ड.
डाटा साठवून ठेवण्याची क्षमता : १ टीबी एचडीडी
कनेक्टिविटीचे पयार्य : वापरकर्ते यूएसबी २.० किंवा ३.० वापरू शकतात. २-इन-१ कार्ड रीडरचाही वापर करू शकतात. या नोटबूकला असलेल्या डीव्हीडी ड्राइव्हचाही वापर करता येईल.

मिलाग्रो एम८ प्रो ३जी
किंमत : २५,९९०
मिलाग्रो बिजनेस आणि नॉलेज सोल्युशन यांनी एक आकर्षक टॅबलेट उपलब्ध केला आहे. एम८ प्रो ३जी असे नाव असलेल्या या टॅबमध्ये १.६ जीएचझेडचे रॉकशिप ३१८८ प्रोसेसर आहे. ज्यात १६ जीबी पर्यंत डाटा साठवून ठेवू शकतो. डाटा साठवण्याची क्षमता मायक्रो एसडी कार्डद्वारे ६४ जीबी पर्यंत वाढवताही येते. २जीबीच्या डय़ूल चॅनेल डीडीआर३ रॅमद्वारे २टीबी अतिरिक्त डाटा साठवून ठेवता येऊ शकतो.
सध्या snapdeal.com संकेतस्थळावर हा टॅबलेट विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. याची किंमत जरी २५,९९० असली तरी एक आठवडय़ापर्यंत तो ग्राहकांना १९,९९९ रुपयांस मिळू शकतो.
अँड्रॉइड जेलीबीनवर चालणाऱ्या या टॅबलेटला १२८० ७ ८०० रिझोल्युशनची ९.४ इंचची गोरिला ग्लास स्क्रीन आहे.

आकर्षक वेबकॅम
किंमत : १५९५ रुपये
अ‍ॅमकेट या भारतीय कंपनीने एक आकर्षक वेबकॅम ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या वेबकॅममध्ये ग्राहकोपयोगी अनेक फीचर्स आहेत.
अ‍ॅटोमॅटिक लो लाइट करेक्शन
एचडी लेन्स : ज्याद्वारे उच्च दर्जाचे हाय डेफिनेशन छायाचित्रण करू शकता.
वेबस्क्रीन कॉम्पॅटिबिलिटी ज्याचा रेशिओ १६.९ इंच आहे. एलसीडी टीव्ही किंवा मोठय़ा स्क्रीनच्या मॉनिटरवरही ते चालू शकते. या वेबकॅमचा मायक्रोफोन बॅकग्राउंडचा आवाजही रेकॉर्ड करू शकतो.

Story img Loader