२४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ १६ जबीचा फोन ३१,९९९ रुपयांना, तर लाकडाचे आणि लेदरचे बॅक पॅनल असलेला फोन ३३,९९९ इतक्या किंमतीला ‘फ्लिपकार्ट’ या वस्तुंची विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचे मोटोरोलाने बुधवारी जाहीर केले. फोन हाताळण्यास चांगला वाटावा यासाठी ‘एफएससी’ने प्रमाणित केलेले लाकूड आणि ‘होरविन’ने प्रमाणित केलेले लेदर यात वापरण्यात आल्याचा दावा कंपनीमार्फत करण्यात आला आहे. कर्व्ह मेटल फ्रेम असलेल्या ‘मोटो एक्स’मध्ये २ जीबी रॅमबरोबर २.५ गेगाहर्टस् क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ५.२” इतका कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चा फूल एचडी डिस्प्ले आहे. मागील बाजूस १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला हा फोन अॅण्ड्रॉईड किटकॅट ४.४.४ प्रणालीवर काम करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New moto x now available on flipkart from rs 31999 onwards