आता लॅपटॉपपेक्षाही टॅब्लेटला अधिक पसंती मिळण्याचा जमाना आहे. पूर्वी टॅब्लेट असे म्हटले की, केवळ हाती पैसे खुळखुळणाऱ्यांसाठीच असा समज होता. पण आता सामान्यांच्या हातीही टॅब्लेट दिसू लागला आहे. पूर्वी हातात एक्झिक्युटिव्ह डायरी घेऊन फिरणारे; आता टॅब्लेट हाती ठेवून फिरताना दिसतात. सोयीचा आकार आणि त्यामध्ये असलेल्या सोयीसुविधा ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत. एक तर टॅब्लेटमुळे जड, मोठय़ा आकाराचे लॅपटॉप आता बाद होतील, अशीच चिन्हे आहेत. अनेकांनी त्यांची नित्यनेमाची कामे टॅब्लेटवरच करण्यास सुरुवात केली आहे. वाय-फायमार्फत करावयाच्या सर्फिग किंवा इतर बाबींसाठी तर टॅब्लेटसारखा चांगला प्रकार नाही. पण पूर्वी टॅब्लेट आणि मोबाइल अशा दोन्ही गोष्टी वागवाव्या लागायच्या. पण आता तोही प्रश्न राहिलेला नाही, कारण आता याच टॅब्लेटमध्ये सिम कार्डाचीही सोय झाली आहे. केवळ तेवडय़ावरच न थांबता अनेक कंपन्यांनी डय़ूएल सिम हा प्रकारही या टॅब्लेटमध्ये बाजारात आणला आहे. त्यामुळे साहजिकच टॅब्लेट्सच्या खपामध्ये विक्रमी वाढ झाली असून दुसरीकडे लॅपटॉप्सच्या खपामध्ये घट झाली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर स्वाइप टेलिकॉम या कंपनीने आता नवीन बजेट अँड्रॉइड टॅब्लेट बाजारात आणला आहे. मध्यंतरीच्या काळात टॅब्लेट्स भरपूर झाले. पण त्यांच्या किमती सामान्यांना तेवढय़ाच्या परवडणाऱ्या नव्हत्या. मात्र आता त्याच्या किमतीही चांगल्याच खाली आल्या आहेत. त्यातही स्वाइपसारख्या कंपन्यांनी ही सर्व उत्पादने सामान्य माणसाला परवडतील, अशा किमतीत बाजारात आणली आहेत. आता बाजारात आणलेला हॅलो व्हॅल्यू प्लस सात इंची टॅब हा देखील याच प्रकारात मोडणारा आहे.
या सात इंची टॅब्लेटचे डिस्प्ले रिझोल्यूशन ८०० ७ ४८० पिक्सेल्स एवढे आहे. त्यामध्ये १.२ गिगाहर्टझ् क्षमतेचा डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यामुळे हा टॅब वेगात काम करतो. त्यासाठी ५१२ रॅम वापरण्यात आले आहे. सध्या कमीत कमी १ जीबी रॅम वापरण्याचा जमाना आहे. त्या तुलनेत हे रॅम अर्धेच आहेत. पण किमान रिव्ह्य़ू दरम्यान तरी कमी क्षमतेच्या रॅममुळे काही समस्या उद्भवली आहे.  या टॅब्लेटसाठी अँड्रॉइड ४.१ जेली बिन ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. यामध्ये सिंगल सिम कार्डाचा स्लॉट असून व्हिडीओ कॉिलगची सोयही देण्यात आली आहे. टॅब्लेटचा आकार १९२ ७ ११६.८ ७ ११.३ मिमी. असे असून त्याचे वजन अवघे ३८० ग्रॅम्स एवढेच आहे. तो वापरायला अतिशय सोयीचा आहे. प्रसंगी खिशामध्येही राहू शकतो.
टॅब्लेटच्या मागच्या बाजूस असलेला कॅमेरा २ मेगापिक्सेल क्षमतेचा तर समोरच्या बाजूस असलेला ०.३ मेगापिक्सेल क्षमतेचा आहे. २ मेगापिक्सेल ही कमी क्षमता वाटली तरी प्रकाशात यावर काढलेले सर्व फोटो बऱ्यापैकी आले. त्याचे पिक्सेल्स फारच कमी फाटलेले दिसले. कनेक्टिविटीसाठी एज, वाय- फाय, ब्लूटूथ यांच्याच बरोबर मायक्रो यूएसबीचाही वापर करता येईल. याची इनबिल्ट मेमरी क्षमता ४ जीबी असून ती मायक्रो एसडी कार्डाच्या माध्यमातून ३२ जीबीपर्यंत वाढविता येते.
बॅटरी ३००० एमएएच क्षमतेची असून ती दीर्घकाळ टिकणारी आहे, असे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले. सात इंची टॅब्लेटच्या वर्गात यापेक्षा स्वस्त आणि चांगला सौदा असणार नाही.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६६९९/-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा