नोकियाने अलिकडेच नोकिया ‘आशा २१०’ या नवीन पण कमी किंमतीच्या फोनची घोषणा केली आहे. त्याची किंमत चार हजारांच्या आसपास असेल परंतु सुविधा मात्र तुलनेने चांगल्या आहेत.विशेष म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी तो वरदान ठरणार आहे. त्याचा कॅमेरा विशेष बटनने कार्यान्वित करता येईल. फोन लॉक असेल तरी हे करता येईल. कमी किमतीत चांगला फोन असे त्याचे वर्णन करता येईल. दुसऱ्या तिमाहीत तो उपलब्ध होणार आहे. चटकन टायपिंगसाठी त्याला क्वेरटी कीपॅड आहे. फेसबुक, ट्विटर व जीमेल यांना तो अनुकूल आहे. सोशल नेटवर्किंग हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. त्याची डय़ुअल सिम आवृत्ती भारतात उपलब्ध केली जाणार असून सिंगल सिम आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध आहे.
नोकिया आशा २१० ची गुणवैशिष्टय़े
कनेक्टिव्हिटी : ब्लूटूथ २.१ इडीआर
स्क्रीन :  ६.१ से.मी, एलसीडी
कॅमेरा : २मेगापिक्सेल (मागील बाजूस)
सिम : सिंगल व डय़ुअल सिम
ओव्हीजीए रेझोल्युशन : ३२० बाय २४० मेगापिक्सेल
अ‍ॅप : विशेष व्हॉट्स अ‍ॅप बटन
मेमरी : ६४ एमबी (३२ जीबीपर्यंत वाढवता येते)
ऑडिओ जॅक : ३.५ मि.मी
बॅटरी : १२०० एमएएच

Story img Loader