उद्योगजगतात किंवा कुठल्याही व्यवसायात व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंटला सर्वात जास्त महत्त्व असते. त्यामुळेच हजारो, लाखो कर्मचारी असलेल्या उद्योगांमध्ये व्यवस्थापक मंडळीच लठ्ठ पगार घेणारी असतात. अमेरिकेतील हार्वर्ड, व्हार्टन यांसारखी जगन्मान्य विद्यापीठे, भारतातील आयआयएमसारख्या संस्थांमधील मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर अभ्याक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी कमालीची चुरस असते. लक्षावधी पदवीधर वर्षभर यांच्या प्रवेशपरीक्षांचा अभ्यास करत असतात.
परंतु व्यवस्थापन म्हणजे नक्की काय? ते शिकण्यासाठी विद्यापीठातच जावे लागते का? की त्यासाठी इतर काही पर्याय आहेत? खरं सांगायचं झालं तर व्यवस्थापनाचे शिक्षण म्हणजे व्यवहारज्ञान आणि त्याची आवश्यकता फक्त उद्योगधंद्यासाठी आणि व्यवसायांसाठी असते असेही नाही.
घरातली सर्व कामे वेळच्या वेळी आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गृहिणीला वेळेचे व्यवस्थापन (टाइम मॅनेजमेंट), महिन्याच्या पगारात सर्व खर्चाचे गणित जमवण्यासाठी आíथक व्यवस्थापन (फायनान्शियल मॅनेजमेंट), बाळगोपाळांकडून खेळ, छंद आणि अभ्यास करून घेण्यासाठी नेतृत्वगुणांची (लीडरशिप स्किल्स) गरज असतेच.
या सर्व कौशल्यांची ओळख विविध उदाहरणांच्या साहाय्याने (केस स्टडीज) करत ते आपल्या कार्यक्षेत्रात कसे वापरायचे याचा अभ्यास म्हणजे व्यवस्थापन शिक्षण. इंटरनेटवर ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या अशा अनेक साईट्स आहेत. यातली एक साइट आज आपण पाहू. ती म्हणजे <http://www.masterclassmanagement.com/&gt;
यावरील कोर्स तुम्हाला विनामूल्य असून तो तुम्हाला केव्हाही करता येतो. त्यासाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. (हा कोर्स झाल्यावर तुम्हाला सर्टििफकेट हवे असेल तर त्यासाठी मात्र पसे भरावे लागतात.) तसेच या कोर्सच्या नोट्स तुम्हाला ई-बुक स्वरूपात हव्या असतील तर ते पसे भरून मिळवण्याची सोय आहे.
या साइटवर असलेला कोर्स दहा पाठांमध्ये विभागला आहे. या पाठांमध्ये व्यवस्थापनाचे विविध पलू उलगडून दाखवलेले आहेत. नेतृत्वगुण कसे विकसित करावेत याच्या १०१ टिप्स दिलेल्या आहेत. ऑफिसमधील तुमच्या डिपार्टमेंटला दिलेली उद्दिष्टे किंवा लक्ष्य गाठण्यासाठी स्टाफला कसे उद्युक्त करावे, स्टाफमध्ये टीमवर्कची भावना कशी वाढवावी याची नमुन्यादाखल उदाहरणे दिलेली आहेत. कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करताना काय काळजी घ्यावी, मुलाखतीत कोणते प्रश्न विचारावेत आणि कोणते विचारू नयेत याचीही चर्चा येथे केली आहे. मॅनेजरला कधी कधी कठोर निर्णयही घ्यावे लागतात. समस्यांची उकल कशी करावी, कर्मचा-यांमधले आपसातले तंटे कसे सोडवावेत, एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्याची वेळ आली तर काय काळजी घ्यावी याचेही मार्गदर्शन येथे केले आहे.
या कोर्समध्ये प्रत्येक पाठाखाली प्रश्नमंजूषा दिलेली आहे. ती सोडवून तुम्हाला विषयाचे आकलन झाले आहे की नाही हे तपासायचे आहे. हा कोर्स व्यवस्थापनावरील एक सर्वसमावेशक कोर्स आहे. जर तुम्हाला त्यातील विशिष्ट विषयाला वाहिलेला कोर्स हवा असल्यास (उदाहरणार्थ मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट-ऌफऊ इत्यादी) इंटरनेटवर असेही कोस्रेस उपलब्ध आहेत. अभ्यासूंनी त्यांचा लाभ जरूर घ्यावा.
manaliranade84@gmail.com

Story img Loader