कुठलेही ज्ञान मिळवण्यासाठी वयाचे बंधन नसते. तुम्ही एखादी कला शिकत असाल तर ती ज्ञानासोबत एक वेगळाच आनंददेखील देऊन जाते. मग ती चित्रकला असो, हस्तकला असो किंवा इतर कुठलीही कला. ओरिगामी, किरीगामी हे शब्द आता सगळ्यांच्याच ओळखीचे झालेले आहेत.
ओरिगामीमध्ये कात्री, िडक यांचा वापर न करता कागदाला केवळ घडय़ा घालून सुंदर वस्तू बनवल्या जातात. तर किरीगामीमध्ये ओरिगामीप्रमाणेच कागदाला घडय़ा घातल्या जातात, पण त्याचबरोबर कागदाला विशिष्ट पद्धतीने काप दिले जातात. भेटकार्ड उघडल्यावर एखादे सुंदर फूल उमलताना दिसणे हे किरीगामीचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
असाच आणखी एक हस्तकलेचा प्रकार आपल्या परिचयाचा होऊ लागला आहे तो म्हणजे पेपर क्विलिंग. क्विलिंग म्हणजे कागदाच्या पट्टय़ांची गुंडाळी करून त्याला एका विशिष्ट प्रकारे आकार देणे. अशा काही प्राथमिक आकार वापरून अनेक उत्तमोत्तम डिझाइन्स बनू शकतात. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे कागदी पट्टय़ा, क्विलिंग टूल इत्यादी बाजारात सध्या सहज उपलब्ध आहे. त्याचबरोबर क्विलिंगची डिझाइन वापरून बनलेल्या अनेक वस्तूदेखील उपलब्ध आहेत. जसे की, फोटो फ्रेम्स, वॉल हँिगग्ज, रांगोळ्या तसेच कानातले झुमके, पेंडंट्स इत्यादी.
तुमच्यापकी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण होत असेल की या सुंदर कलाकृती कशा बनवतात? तर ज्यांना पेपर क्वििलगची कला आधीच अवगत आहे ते नवनवीन पॅटर्नस्च्या शोधात असतात. याचे मार्गदर्शन करणाऱ्या काही साइट्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
<http://quillingmadeeasy.com/> या साइटवर पेपर क्वििलगसंबंधात अनेक व्हिडीओ टय़ुटोरियल्स आहेत. यामध्ये तुम्हाला क्वििलगचे विविध पॅटर्न तयार करण्यासाठी सुरुवात कुठून करायची, त्यासाठी कशा प्रकारची रंगसंगती वापरायची याचे मार्गदर्शन मिळेल. या साइटवरील व्हिडीओज यूटय़ूबवरील <https://www.youtube.com/channel/UC0c4yfHvIxoJ5rPR1GOJ6BQ> या िलकवर उपलब्ध आहे.
पेपर क्वििलग या कलेची माहिती आपल्याला नवीनच होत असली तरी प्रत्यक्षात ही कला १६ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. त्या वेळी प्राचीन इजिप्तमधील काही लोक तसेच फ्रेंच आणि इंग्लिश राजघराण्यातील स्त्रिया छंद म्हणून ही कला जोपासण्यात आपला वेळ सत्कारणी लावत. इतिहासात अशीही नोंद सापडते की चर्चमधील नन्ससुद्धा या कलेचा आनंद घेत.
वरील दिलेल्या साइटशिवाय सोबत दिलेल्या िलक्ससुद्धा तुम्हाला आवडतील अशी खात्री वाटते. त्या तुम्ही आवर्जून पाहाव्यात.
<https://www.youtube.com/playlist?list=PLS72s_8OgvvHVrUVK0Zk6VlK6f3KjjMxJ>
<https://www.youtube.com/user/artandcraftbyqme>
– मनाली रानडे, manaliranade84@gmail.com
गुंडाळ्यांची कलाकुसर
ओरिगामी, किरीगामी हे शब्द आता सगळ्यांच्याच ओळखीचे झालेले आहेत.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 17-11-2015 at 09:08 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Origami kirigami online tutorial