आपल्या कामाच्या वेळात मोबाइल किंवा टॅबलेट बंद पडला तर खूप अस्वस्थ व्हायला होतं. पण यावर उपाय म्हणून पॉवर बँक बाजारात आले आहेत. म्हणजेच पोर्टेबल चार्जर. याविषयी अनेक समज गरसमज आहेत. नेमके हे पॉवर बँक काय काम करतात. पॉवर बँक घेत असताना कोणती काळजी घ्यायची. तसेच काही स्वस्त आणि मस्त पॉवर बँकविषयी आपण जाणून घेऊ या.
गेल्या काही वर्षांमध्ये पोर्टेबल उपकरणे खरेदीचे प्रमाण खूप वाढले आहे. पेजरपासून सुरू झालेला हा प्रवास आता स्मार्टफोनपर्यंत येऊन पोहोचला आहे. स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटकच बनला आहे. यामुळे जर आपल्याकडे एखाद तास जरी स्मार्टफोन नसला तरी आपल्याला खूप अस्वस्थ व्हायला होतं. स्मार्टफोनने आपल्या खिशात सारं जग आणून ठेवलं आहे. मात्र त्याची बॅटरीची क्षमता खूप कमी असते. यामुळे अनेकदा फोन बंद होण्याचे प्रकार होतात आणि आपल्याला ऐन कामाच्यावेळी फोनचा वापर होत नाही. याला पर्याय म्हणून अनेकांनी दुसरी बॅटरी बाळगण्यास सुरुवात केली. पण तोही पर्याय अनेकांना उपयुक्त वाटला नाही. यानंतर पोर्टेबल चार्जर बाजारात आले. यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण या चार्जरमध्येही काही डुप्लिकेट चार्जर बाजारात आले आणि अनेकांचा गोंधळ उडाला. डुप्लिकेट चार्जर बाजारात अगदी १०० रुपयांपासून मिळू लागले, यामुळे त्याची विक्री वाढली पण त्याची उपयुक्तता योग्य नसल्यामुळे अनेकांचे १०० रुपये वाया गेले. याचबरोबर काही सौरऊर्जेवर चालणारे चार्जरही ५० रुपयांत उपलब्ध होऊ लागले, पण तेही काही प्रभाव पाडू शकले नाही. अनेकदा हे चार्जर जोडल्यावर बॅटरी कमी होण्याचे किंवा चाìजग पिन खराब होण्याचे प्रकार घडले. यामुळे पोर्टेबल चार्जर घेताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. कमी पशात उपलब्ध होतात म्हणून घेण्यापेक्षा थोडे पसे खर्च करून चांगल्या दर्जाचे चार्जर घेणे केव्हाही उपयुक्त ठरू शकते.
पोर्टेबल चार्जर घेताना खालील बाबी तपासून पाहा.
१. क्षमता – पॉवर बँक घेताना सर्वात महत्त्वाचा भाग तपासणे गरजेचे असते, तो म्हणजे त्याची क्षमता. या चार्जरची क्षमता ही मिली एम्पिअर अवर्स म्हणजेच ‘एमएएच’मध्ये मापली जाते. पॉवर बँक एकदा चार्ज केल्यावर नेमका त्याचा वापर किती वेळा चाìजगसाठी होऊ शकतो हे सांगणे तसे कठीण आहे. कारण चाìजग होत असतानाही आपला फोनचा वापर सुरूच असतो. पण हे घेत असताना जास्त क्षमतेची पॉवर बँक घेणे केव्हाही योग्य ठरते. म्हणजे तुम्हाला किमान १५०० एमएएचची पॉवर बँक ही घ्यावीच लागणार.
ग् १५०० एमएएचची पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यावर मोबाइल एकदा पूर्ण चार्ज करू शकते.
ग् ५२०० एमएएचची पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यावर मोबाइल दोनदा पूर्ण चार्ज किंवा टॅबलेट ५० टक्केचार्ज करू शकते.
ग् १००० एमएएचची पॉवर बँक पूर्ण चार्ज झाल्यावर मोबाइल चार वेळा पूर्ण चार्ज किंवा टॅबलेट १०० टक्के चार्ज करू शकते.
बाजारात याहीपेक्षा जास्त क्षमतेचे पोर्टेबल चार्जर उपलब्ध आहेत.
२. यूएसबी चाìजग – काही पॉवर बँक्समध्ये यूएसबी चाìजगची कॉर्ड ही चार्जरलाच जोडलेली असते, पण काही पॉवर बँकमध्ये ही कॉर्ड वेगळी दिलेली असते. यामुळे अनेकदा जर आपण कॉर्ड घ्यायला विसरलो तर नक्कीच चाìजगची अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे शक्यतो इनबिल्ड यूएसबी चाìजग कॉर्ड असलेले चार्जर घेणे उपयुक्त ठरते. काही ब्रँडेड चार्जरमध्ये एक कनेक्टेड कॉर्ड असते. त्या कॉर्डला विविध प्रकारचे चाìजग कनेक्टर दिलेले असतात.
३. किंमत आणि दर्जा – पोर्टेबल चार्जर खरेदी करत असताना त्याच्या दर्जाचा नेहमीच विचार करा. एखाद वेळेस किंमत थोडी जास्त मोजावी लागली तरी चालेल, पण दर्जा मात्र नक्कीच चांगला असायला हवा. काही कमी दर्जाच्या पोर्टेबल चार्जरमुळे फोन खूप जास्त गरम होणे, शॉर्ट सर्किट होणे असे प्रकार झालेले आहेत. यामुळे शक्यतो चांगल्या कंपनीचेच चार्जर घेणे योग्य ठरेल. तुम्ही जास्त क्षमतेचे चार्जर कमी पशांत घेतले तर अनेकदा ते तुमचा फोन नीट चार्ज करत नाही. यामुळे ते एक प्रकारे आपले नुकसानच होते. यामुळे या चार्जरची खरेदी करताना पशांचा विचार न करता दर्जाचा विचार करणे केव्हाही फायद्याचे ठरेल.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या २००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चार्जरविषयी माहिती करून घेऊ या.
सोनी सायकल एनर्जी युनिव्हर्सल चार्जर
हे चार्जर १०००० एमएएचचे यूएसबी एक्स्टेन्डेड चार्जर आहे. हे चार्जर सध्या बाजारात असलेल्या सर्व स्मार्टफोनला उपयुक्त असे आहे. हे चार्जर संगणकाच्या यूएसबी पोर्टलच्या माध्यमातून चार्ज करता येते. यामध्ये मायक्रो यूएसबी केबल देण्यात आली आहे. तसेच चार्जरला दोन यूएसबी पोर्टलही देण्यात आले आहेत. याची तुम्हाला एक महिन्याची वॉरंटी मिळू शकते.
किंमत – १९९९ रुपये.
डिजिफ्लिप इसेन्शिअल पीसी ००१
डिजिफ्लिप या मोबाइल अॅक्सेसरीज कंपनीचे हे चार्जर असून ते २२०० एमएएच क्षमतेचे आहे. या चार्जरमध्ये आपल्याला एक विशेष सुविधा आहे. म्हणजे यामध्ये आपण विविध चाìजग पिन असलेले फोन चार्ज करू शकतो. यामध्ये नोकियाच्या तसेच ब्लॅकबेरीच्या बारीक पिनपासून ते अॅपलच्या पिनचाही समावेश आहे. या चार्जरबरोबर एक यूएसबी कॉर्ड देण्यात येते. त्याचबरोबर चार वेगवेगळ्या चाìजग पिनही देण्यात येतात.
किंमत – १००० रुपये.
नोकिया डीसी-१६ चार्जर
मोबाइलची क्रांती घडविणाऱ्या नोकिया या कंपनीने पोर्टेबल चार्जरही बाजारात आणले आहेत. हे चार्जर उभे गोलाकार असून याचे वजन ७५ ग्रॅम आहे. याची क्षमता २२०० एमएएच इतकी आहे. यामध्ये मायक्रो यूएसबी कनेक्टर देण्यात आला आहे. याला एलईडी इंडिकेटरही देण्यात आला आहे. ज्यामुळे आपल्याला मोबाइल चार्ज होत आहे की नाही हे समजते. याचा चाìजगचा वेगही खूप जास्त आहे. याला सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. हा चार्जर चार वेगवेगळ्या रंगात उपलब्ध आहे.
किंमत – १४९९ रुपये.
मोलाइफ पॉवर बँक
ट्रेक, क्रीडा क्षेत्रातील गोष्टींचे तसेच मोबाइल अॅक्सेसरीजचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीचे पॉवर बँक बाजारात उपलब्ध आहे. हे पॉवर बँकही विविध प्रकारच्या मोबाइलसाठी उपयुक्त असून, यामध्ये आपल्याला सात प्रकारच्या वेगवेगळ्या पिन्स देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर यामधील डिव्हाइसमध्ये आठ जीबी स्टोअरेजही देण्यात आले आहे. या पॉवर बँकची क्षमता २६०० एमएएच आहे.
किंमत – १४९९ रुपये.
वॉक्स मोबाइल पॉवर बँक
या कंपनीने ५६०० एमएएचची पॉवर बँक उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये आपल्याला यूएसबी देण्यात आली आहे. हा चार्जर अॅपलपासून सर्वच मोबाइलला उपयुक्त ठरतो. याशिवाय या पॉवर बँकमध्ये एफ रेडिओ ऐकण्याची सुविधाही आहे. इतकेच नव्हे तर यात आपण ३२ जीबीचे मेमरी कार्ड टाकून गाणीही ऐकू शकतो. याशिवाय यामध्ये टॉर्चही देण्यात आली आहे. यामुळे ट्रेकला जाणाऱ्यांसाठी हे चार्जर खूप उपयुक्त आहे. फक्त हा आकाराने मोठा असल्याने हाताळण्यास थोडा मोठा वाटू शकतो. तसेच याचे वजन १८० ग्रॅम इतके आहे. याला सहा महिन्यांची वॉरंटीही देण्यात आली आहे.
खिशातली पॉवर बँक
आपल्या कामाच्या वेळात मोबाइल किंवा टॅबलेट बंद पडला तर खूप अस्वस्थ व्हायला होतं. पण यावर उपाय म्हणून पॉवर बँक बाजारात आले आहेत.
First published on: 22-08-2014 at 06:42 IST
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portable mobile chargers