उपकरण खरेदी केल्यावर त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉल करत असलेल्या अॅप्स किंवा सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून आपल्या उपकरणात अॅडवेअर्स वगैरे जातात. पण हेच अॅडवेअर्स पूर्वअंतर्भूत सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून जाऊ लागले तर तो मोठा धोका असू शकतो. येणाऱ्या काळात हा धोका खूप मोठा असेल अशी भीती क्विक हील टेक्नॉलॉजी लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या तिमाहीतील भीती अहवालात व्यक्त केली आहे. पुढील तिमाहीत अशा प्रकारच्या अॅडवेअर्सकडून धोका असेल, असेही अहवालात नमूद केले आहे.
या अहवालामध्ये आयटी सुरक्षितता सातत्याने कशा प्रकारे विकसित होत आहे हेही नमूद केले आहे, तसेच मालवेअरचे नमुनेही वाढत असल्याचे आढळले आहे. अहवालात प्रमुख मालवेअर धोके, नमुने व िवडोज आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्म या दोन्हींचे आगामी ट्रेंड दिले आहेत. या अहवालाबाबत कंपनीचे सीटीओ संजय काटकर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत आम्ही अँड्रॉइड व िवडोज या प्लॅटफॉर्मवर रॅन्समवेअर व अॅडवेअर कोसेसचे प्रमाण वाढत असल्याचे पाहिले आहे. अलीकडच्या काळात विविध फाइल फॉरमॅट आणि सोशल इंजिनीअिरग ट्रिक्समुळे रॅन्समवेअरमध्ये सुधारणा झाली आहे आणि जास्तीतजास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी व परिणाम वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे.
प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा