आयफोनने केलेल्या अनेक क्रांतींपैकी एक म्हणजे व्हॉइस रेकग्निशन आणि सिरी हा तुमचा साहाय्यक. अर्थात भारतासारख्या देशात अमेरिकन वळणाचे इंग्रजी ही समस्या असली तरी जगभरात अनेक जण या सिरीवर खुश आहेत. पण मध्यंतरी अ‍ॅपलनेच केलेल्या पाहणीत असे लक्षात आले की, हा सिरी फारच सीरियस आहे. कारण त्याला भावभावना नाहीत. त्यामुळेच अशी वदंता आहे की, अ‍ॅपलने आता त्यांच्या कोअर टीमला कामाला लावले आहे. त्यांच्यासमोर लक्ष्य देण्यात आले आहे ते सिरीला भावभावना प्राप्त करून देण्याचे. त्यामुळेच तुम्ही आनंदी असाल तेव्हा वेळ पाहून कदाचित सिरी एखादी कोटीही करेल किंवा तुम्ही दुखी आहात असे लक्षात आले तर एखादा विनोद ऐकवून तुमची हसवणूकही करेल. अर्थात हा प्रयत्न म्हणजे संगणकाला बुद्धी प्राप्त करून देण्याची एक महत्त्वाची पायरीच आहे, अशीही चर्चा सध्या रंगली आहे.. थेट बुद्धी ही नंतरची पायरी मानली तरी भावना ही पहिली पायरी असू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Story img Loader