गेल्या २५ वर्षांमध्ये व्हिडिओकॉन या ब्रॅण्डने भारतीय जनमानसामध्ये स्वतची अशी एक वेगळी छबी निर्माण केली आहे. व्हिडिओकॉनचा मोबाईल घेताना लोक हजार वेळा विचार करत असले तरी जेव्हा टीव्ही विकत घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र अनेकदा पहिली पसंती व्हिडिओकॉन असते. त्यामुळे त्यांच्या टीव्ही सेटस्ना चांगली मागणी आहे. स्मार्ट टीव्हीमध्येही त्यांनी डीडीबी एलइडी टीव्ही आता बाजारात आणला आहे. दृश्यरूपामध्ये हा एलइडी टीव्ही बाजी मारतो ती त्याच्या आकारामध्ये. ५८, ६५ आणि ८० इंच या मोठय़ा आकारांमध्येच तो उपलब्ध आहे. या टीव्हीची खरेदी केल्यानंतर तुम्हाला वेगळा सेट टॉप बॉक्स विकत घेण्याची गरज नाही. कारण व्हिडिओकॉनने या टीव्हीमध्येच तुम्हाला सेट टॉप बॉक्सही आतमध्येच दिला आहे. अर्थात केवळ हेच त्याचे वैशिष्टय़ नाही तर याशिवाय स्मार्ट टीव्ही असे म्हटल्यानंतर ज्या काही सुविधा तुम्हाला त्यामध्ये मिळतात, त्या त्या सर्व सुविधा या टीव्हीमध्ये समाविष्ट आहेतच.
त्याही पलीक़डे जाऊन व्हिडिओकॉनने टूडी आणि थ्रीडी कन्व्हर्जनची सोय यात दिली आहे. या टीव्हीचा आनंद अधिक चांगला लुटता येईल तो फ्किलर फ्री थ्रीडीमुळे. अनेक टीव्हींमध्ये थ्रीडी पाहताना चित्र हलत असल्याचा आभास होतो. त्यामुळे एकतर चित्राची स्पष्टता कमी होते आणि शिवाय ती हलती चित्रे तीही थ्रीडीमध्ये पाहिल्यामुळे खूप त्रासही होतो. या फ्किर फ्री तंत्रज्ञानामुळे तो त्रास सहज टाळता येईल.
याशिवाय याची दृश्यात्मकता वाढविण्यासाठी यामध्ये रंगसंगतीसाठी अधिक चांगल्या बाबींचा तांत्रित वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रंगसंगती केवळ सुखद नाही तर ती वास्तवाच्या अधिक जवळ जाणारी पाहायला मिळते. याशिवाय युनिव्हर्सल प्लग अॅण्ड प्ले, फाइल शेअरिंग, १० बॅण्ड ग्राफिक इक्विलायझर आदींची सोय यामध्ये देण्यात आली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २ लाखाच्या पुढे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा