सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड डय़ुओस x एचटीसी डिझायर एसव्ही
सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅण्ड डय़ुओस आणि एचटीसी डिझायर एसव्ही हे दोन्ही स्मार्टफोन साधारणपणे एकाच किंमतीत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सना चांगली मागणी आहे. एकाच किंमतीत दोन कंपन्यांचे स्मार्टफोन्स उपलब्ध झाले की, अशा वेळेस ग्राहकांची मात्र पंचाईत होते किंवा विचार करताना गोंधळ उडतो. त्यामुळे त्या संदर्भात विचारणा करणाऱ्या फोनमध्ये वाढ झाल्यामुळे अखेरीस याच्याही संदर्भात त्यांचा तुलनात्मक तक्ता प्रसिद्ध करण्याचा निर्णय टेक- इटने घेतला. तुलनात्मक तक्त्यामुळे स्मार्टफोन किंवा मग लॅपटॉपदेखील खरेदी करताना निर्णय घेणे तसे सोपे जाते, अशा वाचकांच्या प्रतिक्रिया टेक- इट कडे आल्या आहेत.
तुलनात्मक तक्ता
क्रिएटिव्ह टी ३१५०
महत्त्वाचे म्हणजे क्रिएटिव्हची ही स्पीकर सिस्टिम पूर्णपणे वायरलेस तत्त्वावर काम करणारी आहे. त्यासाठी ब्लूटूथ हे माध्यम म्हणून वापरले जाते. ब्लूटूथचा वापर तर अनेक उपकरणांमध्ये होत असतो. किंबहुना स्मार्ट उपकरणांच्या एका परिमाणामध्ये आता ब्लूटूथचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशी स्मार्ट उपकरणे असलेल्या स्मार्टफोनपासून ते टॅब्लेटपर्यंत सर्वच उपकरणांना हे ब्लूटूथ माध्यम असलेले स्पीकर्स जोडून त्यांचा वापर करता येईल आणि चांगल्या संगीताचा आनंद सहज लुटता येईल.
यासाठी क्रिएटिव्हने सॅटेलाईट फीचर डिझाईन म्हणजेच इमेज फोकसिंग प्लेटचा वापर केला आहे. त्यामुळे त्याचे अॅकॉस्टिक चांगले असून त्यातून येणाऱ्या आवाजाची सुश्राव्यताही वाढली आहे. याला जोडलेल्या सबवुफरमुळे उत्तम बास लेव्हलचा अनुभव घेता येतो. याशिवाय याला एका खास रिमोट कंट्रोलची सुविधाही कंपनीने दिली आहे. त्यामुळे बसल्याजागी आपल्याला सिस्टिममधील बदल करता येतात.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ३,९९९/-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा