लिनोवो ए२१०७
लिनोवोने आता सात इंची डिस्प्ले असलेला टॅब्लेट बाजारात आणला आहे. हा अँड्रॉइड ४.० आइस्क्रीम सँडवीच या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारा टॅब आहे. इ- बुक्सचे वाचन किंवा मेल्स पाहण्यासाठी हा आकार अतिशय सोयीचा मानला जातो. शिवाय हे सारे प्रवासात करण्यासाठीही सात इंची आकारा सोयीचा आहे. यामध्ये एचडी व्हिडिओ रेकॉर्डिगची सोय आहे. शिवाय याचा स्क्रीन फोर पॉइंट कपॅसिटीव्ह टचस्क्रीन आहे. याची बॅटरी तब्बल आठ तास कार्यरत राहते, असा कंपनीचा दावा आहे. या उपकरणाला स्वतची मेमरी १६ जीबीची आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत: रु. १४,०००/-
सोनी एनइएक्स-६
येणारा जमाना मिररलेस कॅमेऱ्याचा आहे, हे गृहीत धरून आता सर्वच कंपन्यांनी आपापल्या बाह्य़ा सरसावल्या आहेत. त्यात आता सोनीनेही आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अलीकडेच एनएक्स-
या कॅमेऱ्यासाठीही सोनीने १६.१ मेगापिक्सेल एक्समोर एपीएस एचडी सीमॉस सेन्सर वापरला आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यावर केलेले प्रतिमांकन चांगले ठरते. म्हणजेच डीएसएलआरने टिपलेल्या फोटोच्या तुलनेत ते चांगले ठरते.
यामध्ये फूल एचडी व्हिडिओची सोयही देण्यात आली आहे. यामध्ये सोनीने बायोन्झ इमेज प्रोसेसरचा वापर केला आहे. त्यामुळे कमी प्रकाशात टिपलेल्या छायाचित्रांमध्येही नॉइज लेवल कमी ठेवण्यात यश आल्याचा कंपनीचा दावा आहे. नेमक्या फ्रेमिंगसाठी एक्सजीए ओएलइडी टल एचडी व्हिडिओची सोयही देण्यात आली आहे. यामध्ये सोनीने बायोन्झ इमेज प्रोसेसरचा वापर केला आहे. त्यामुळे कमी प्रकाशात टिपलेल्या छायाचित्रांमध्येही नॉइज लेवल कमी ठेवण्यात यश आल्याचा कंपनीचा दावा आहे. नेमक्या फ्रेमिंगसाठी एक्सजीए ओएलइडी ट्रु फाइंडरचा वापर केला आहे. याच्या मागच्या बाजूस तीन इंची डिस्प्ले असून तो पुढे मागे खेचून कॅमेऱ्याचा अँगल बदलण्याची सोयही यात आहे.
भारतीय बाजारपेटेतील किंमत : रु. ४९,९९०/-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा