वेगळा इंटरनेट अनुभव देण्याच्या उद्देशाने नोकियाने आशा २०५ आणि नोकिया २०६ अशी दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणली आहेत. ही दोन्ही मॉडेल्स सिंगल सिम आणि डय़ुएल सिम दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
नोकिया आशा २०५ : सोशल मोबाईल फोन
नोकियाने बाजारात आणलेल्या या मोबाईलचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला क्वर्टी की बोर्ड असून सोशल नेटवर्किगसाठी एक खास फेसबुक बटन देण्यात आले आहे. त्यामुळे सतत सोशल नेटवर्किगसोबत कनेक्टेड राहण्यासाठी आसुसलेल्या तरुणाईला हा फोन आपलासा वाटू शकतो. किंबहुना तरुणाईला समोर ठेवूनच हे उत्पादन आकारास आणले आहे. फेसबुक बटनाशिवाय इ- बडी, चॅट, ट्विटर, इ-मेलची सोय आदी अनेक बाबीही यात देण्यात आल्या आहेत. यामध्ये असलेल्या इ- बडी स्क्रीन नोटिफिकेशन्समुळे सतत अपडेट राहाता येते. यासोबत लाइफ प्लस अॅप्स मोफत देण्यात आली आहेत. त्यात लाइफ स्किल्स आणि लाइव्ह हेल्थी सेवांचा समावेश आहे. नोकिया स्टोअरमधील ४० गेम्स यासोबत मोफत डाऊनलोड करता येतील. यातील डय़ुएल सिम फोनमध्ये नोकिया इझी स्व्ॉप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या सिम कार्डाचा वापर करण्यापूर्वी फोन बंद करावा लागत नाही. कंपनीचा दाव्यानुसार, सिंगल सिम असलेल्या मोबाईलचा स्टॅण्ड बाय टाइम ३७ दिवस तर डय़ुएल सिमचा तोच कालावधी २५ दिवसांचा आहे.
नोकिया २०६
नोकिया २०६ हा मोबाईल जुन्या पारंपरिक मोबाईलप्रमाणेच दिसणारा आहे. मात्र त्याला २.४ इंचाचा मोठा स्क्रीन देण्यात आला असून त्यामुळे इंटरनेट पाहाणे, गेम्स खेळणे, मित्रांशी चॅटवर गप्पा मारणे हे सारे सहज करता येते. फेसबुक आणि ट्विटरचा अॅक्सेसदेखील होम स्क्रीनवरच देण्यात आला आहे. वेगवेगळ्या आकर्षक रंगसंगतीमध्ये हे मॉडेल उपलब्ध आहे.
या मॉडेलचे काही विशेष
* सोबत वापरलेल्या इमेजिंग तंत्रज्ञानामुळे यातील १.३ मेगापिक्सेल कॅमेऱ्यावर टिपलेले फोटो लगेचच शेअर करणे शक्य आहे.
* सोबत इ- बडी, वॉटस्अॅपचा वापरही करता येईल.
* हे मॉडेल सिंगल व डय़ुएल सिम दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे.
* डय़ुएल सिममध्ये त्याचा वापर करताना दरखेपेस फोन बंद करण्याची गरज नसते. त्यासाठी नोकिया इझी- स्व्ॉप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
* बॅटरीचा स्टॅण्ड बाय टाइम सिंगल सिममध्ये ४७ दिवस तर डय़ुएल सिममध्ये २८ दिवसांचा आहे.
* भारतीय बाजारपेठेतील किंमत नोकिया रु. –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा